प्रियकराला घरी बोलवलं अन् पतीची सुनियोजित हत्या! शेवटी, त्या चुकांमुळे पकडली गेली अन्...

मुंबई तक

एका महिलेने आपल्या प्रियकर आणि साथीदारांसोबत मिळून पतीची हत्या केल्याची बातमी समोर आली आहे. खरं तर, ही हत्या सुनियोजित असून सुद्धा पत्नीच्या काही चुकांमुळे ती लगेच पकडली गेली.

ADVERTISEMENT

प्रियकराला बोलवून पतीची सुनियोजित हत्या...
प्रियकराला बोलवून पतीची सुनियोजित हत्या...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

प्रियकराला घरी बोलवलं अन् पतीची सुनियोजित हत्या!

point

शेवटी, त्या चुकांमुळे पकडली गेली अन्...

Crime News: एका महिलेने आपल्या प्रियकर आणि साथीदारांसोबत मिळून पतीची हत्या केल्याची बातमी समोर आली आहे. खरं तर, ही हत्या सुनियोजित असून सुद्धा पत्नीच्या काही चुकांमुळे ती लगेच पकडली गेली. संबंधित घटना ही फरीदकोट येथील एका परिसरात घडल्याची माहिती आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान, घरात चोरी होत असताना त्या चोरांनीच पीडित तरुणाची हत्या केल्याचं पोलिसांना भासवण्यात आलं. पत्नीने पोलिसांना सांगितलं की, रात्री काही चोर अचानक घरात घुसले, घरातील वस्तूंची तोडफोड केली आणि तिच्या पतीची हत्या करून फरार झाले. घरातील वस्तू सुद्धा अस्ताव्यस्त पडल्या होत्या. परंतु, पत्नीच्या या जबाबावरून पोलिसांना ही संशयास्पद घटना वाटली. 

प्रियकरासोबत मिळून पतीची निर्दयी हत्या 

खरं तर, आरोपी पत्नीने आधी तिच्या नवऱ्याला विष दिलं मात्र त्यावेळी, तरुणाचा मृत्यू झाला नाही. त्यानंतर, तिने आपल्या प्रियकराला घरी बोलवलं. महिलेने तिच्या प्रियकरासोबत मिळून पतीला बेदम मारहाण केली आणि त्याच्या तोंडात बळजबरीने विषारी औषध टाकलं. बेदम मारहाण आणि विषारी औषधामुळे पीडित तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हत्येनंतर, आरोपींनी घरातील सगळ्या जाणूनबुझून वस्तू अस्ता-व्यस्त केल्या आणि महिलेने आरडाओरडा करत संपूर्ण घटना चोरीची असल्याचा दाखवण्याचा प्रयत्न केला. 

हे ही वाचा: "माझ्याजवळ ये..." 3 रीत शिकणाऱ्या मुलीकडे शिक्षकाची घाणेरडी मागणी! वॉशरूममध्ये विद्यार्थीनीसोबत अश्लील कृत्ये अन्...

या चुकांमुळे पकडली गेली 

  • घरात जबरदस्तीने चोर घुसल्याचं किंवा तोडफोडी झाल्याचं संशयास्पद वाटलं.
  • महिलेचे जबाब अनेकदा बदलत होते
  • शेजाऱ्यांना कोणताही चोर घरात शिरताना किंवा जाताना दिसला नाही
  • पतीच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा होत्या, ज्या सहसा चोरीच्या प्रकरणात दिसत नाहीत
  • सीसीटीव्ही फुटेजमध्ये कोणत्याही बाह्य हालचाली आढळल्या नाहीत.
  • फोन कॉल डिटेल्समुळे पत्नी आणि तिच्या प्रियकरातील सतत संपर्क उघडकीस आला

पोलिसांचा तपास 

पोलिसांनी पुराव्यांसह आरोपी महिलेची चौकशी केली आणि त्यावेळी पत्नीने आपल्या गुन्ह्याची कबूली दिली. तणावाखाली येऊन तिच्या प्रियकराने सुद्धा पोलिसांसमोर सरेंडर केलं. प्रकरणातील दोन्ही आरोपींव्यतिरिक्त, त्यांच्या तिसऱ्या साथीदाराला देखील अटक करण्यात आली आहे. पोलीस आता संपूर्ण प्रकरणात चार्जशीट तयार करत आहेत. या क्रूर हत्येमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 
 

हे वाचलं का?

    follow whatsapp