प्रेयसीला पळवून नेलं पण, अल्पवयीन असल्यामुळे लग्न शक्य नव्हतं, शेवटी प्रियकराच्या भावासोबत लग्न करायला लावलं अन्...

मुंबई तक

Crime News, woman forced to marry boyfriend's brother, Crime News in Marathi, due to underage the marriage was not possible, Crime News in marathi, Love affair crime

ADVERTISEMENT

प्रियकराच्या भावासोबत लग्न करायला लावलं अन्...
प्रियकराच्या भावासोबत लग्न करायला लावलं अन्...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

प्रेयसीला पळवून नेलं पण, अल्पवयीन असल्यामुळे लग्न शक्य नव्हतं

point

प्रियकराच्या भावासोबत लग्न करायला लावलं अन्...

point

तरुणीसोबत नेमकं काय घडलं?

Crime News: दिल्लीच्या नोएडा येथून एका अल्पवयीन मुलीचं अपहरण आणि बळजबरीने लग्न लावल्याचं प्रकरण उघडकीस आलं आहे. या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे. 28 सप्टेंबर रोजी या प्रकरणासंबंधी तक्रार दाखल करण्यात आली असून यामध्ये 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. 

अल्पवयीन असल्याने लग्न करण्यासाठी अडथळा

तक्रारीनुसार, हिमांशू, दीपक उर्फ कल्ली आणि वंश त्यागी नावाच्या तरुणांनी पीडितेला त्यांच्यासोबत पळवून नेलं होतं. या प्रकरणाच्या तपासादरम्यान, एक धक्कादायक बाब उघडकीस आली. अल्पवयीन पीडितेने पोलिसांना सांगितलं की, तिचं हिमांशूवर प्रेम असून 27 सप्टेंबर रोजी आपल्या मर्जीनेच ती त्याच्यासोबत पळून गेली होती. ते दोघे एकमेकांसोबत लग्न करणार होते मात्र, अल्पवयीन असल्याकारणाने त्यांचं कोर्ट मॅरेज होणं शक्य नव्हतं. 20 दिवसांनंतर, पीडिता प्रौढ झाली आणि 17 नोव्हेंबर रोजी इलाहाबादच्या एका मंदिरात तिने हिमांशूसोबत लग्न केलं.

हे ही वाचा: चंद्रपूर: सुखी संसार सुरू असताना परपुरुषाशी तार जुळले, प्रेमासाठी आणाभाका अन् दोघांनी मिळून नवऱ्याला संपवलं

प्रेयसीला भावासोबत लग्न करायला लावलं अन्... 

पीडितेच्या आरोपानुसार, सौरभ, बॉबी भाटी, पदम सिंग, अंकुश आणि हिमांशू यांनी तिला पोलिस कारवाई टाळण्यासाठी चिरागसोबत कायदेशीररित्या लग्न करण्यास आणि हिमांशूसोबत राहण्यास सांगितलं. चिराग हा हिमांशूच्या आत्याचा मुलगा असून 27 नोव्हेंबर रोजी गाझियाबादच्या एका मंदिरात तरुणीने चिरागसोबत लग्न केलं. त्यानंतर, 4 डिसेंबर रोजी त्या दोघांनी कोर्ट मॅरेज केलं. लग्नानंतर, पीडिता हिमांशूसोबत त्याच्या आत्याच्या घरात राहत होती. 

हे ही वाचा: वर्धा: घरात आई-वडिलांचे सतत वाद... डिप्रेशनमध्ये गेलेल्या मुलीने विषारी वायू गिळून संपवलं आयुष्य!

गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल 

चौकशीदरम्यान, हिमांशूने सांगितलं की त्याचं पीडितेवर प्रेम असून अल्पवयीन असल्याकारणाने त्यांचं कायदेशीररित्या लग्न होत नव्हतं. त्यामुळे, एकमेकांसोबत राहण्यासाठी त्याने प्रेयसीला त्याचा भाऊ चिरागसोबत लग्न करायला लावलं. पोलिसांनी आरोपींना अटक केली असून त्यांच्याविरुद्ध पोक्सोसह गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास केला जात आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp