Personal Finance: Credit Card डिस्काउंट पडेल महागात, अडकाल चांगलेच जाळ्यात

रोहित गोळे

Festive Shooping on Credit Card: सणासुदीच्या काळात, क्रेडिट कार्ड पेमेंटवर दिल्या जाणाऱ्या अतिरिक्त सवलती आणि कॅशबॅकमुळे लोक मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. पण क्रेडिट कार्ड खर्चावर नियंत्रण ठेवलं नाही तर तुम्ही मोठ्या अडचणीत देखील सापडू शकता.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Personal Finance Tips for Festive Shooping on Credit Card: सणासुदीच्या काळात भारतात ऑनलाइन खरेदी प्रचंड वाढत आहे आणि त्यासोबतच क्रेडिट कार्डचा वापर देखील वाढला आहे. फ्लिपकार्ट आणि अमेझॉनसारख्या साइट्सवर कार्ड पेमेंटवर दिल्या जाणाऱ्या अतिरिक्त सवलती आणि कॅशबॅकमुळे लोक मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत क्रेडिट कार्ड वापरून ऑनलाइन खर्च वाढला आहे, ज्यामध्ये 26.8% अधिक व्यवहार आणि 34.8% अधिक मूल्य आहे. दररोज सुमारे ₹5286 कोटी किंमतीच्या खरेदी केल्या जात आहेत. दरम्यान, डेबिट कार्ड खरेदीमध्ये 22.6% घट झाली आहे.

क्रेडिट कार्डची सोय जितकी सोपी वाटते तितकीच ती धोकादायक देखील ठरू शकते. जर क्रेडिट कार्डचा गैरवापर केला गेला तर तुम्ही कर्जाच्या सापळ्यात अडकू शकता.

क्रेडिट कार्डपासून का राहावे सावध?

  1. सर्वात महागडे कर्ज: क्रेडिट कार्डवरील व्याजदर वार्षिक 35% ते 48% पर्यंत असतं, म्हणजे जर तुम्ही तुमचे बिल वेळेवर भरले नाही तर ते पर्सनल किंवा  होम लोनपेक्षा अनेक पटीने महाग ठरू शकतं. उदाहरणार्थ,  Flipkart SBI Credit Card वरील व्याजदर दरमहा 3.75% म्हणजे वार्षिक तब्बल 45% एवढं आहे.
  2. मिनिमम पेमेंट ट्रॅप: जर तुम्ही दरमहा फक्त किमान देय ( Minimum Due) रक्कम भरली तर कर्ज फेडण्यासाठी अनेक वर्षे लागू शकतात. उदाहरणार्थ, जर तुमचे बिल ₹50,000 असेल आणि तुम्ही दरमहा फक्त  Minimum Due रक्कम भरत असाल तर कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला तब्बल 9 वर्षे लागू शकतात.
  3. क्रेडिट स्कोअरवर होतो परिणाम: जर तुम्ही वारंवार तुमच्या मर्यादेच्या जवळ खर्च करत असाल तर तुमचा क्रेडिट स्कोअर कमी होऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते, तुमच्या एकूण मर्यादेच्या 30% पेक्षा जास्त खर्च करू नका. उदाहरणार्थ, जर तुमची मर्यादा ₹1 लाख असेल तर फक्त ₹30,000 पर्यंत खर्च करा.
  4. नोकरीच्या अनिश्चिततेचा धोका: अलीकडेच आयटी क्षेत्रात आणि इतर कंपन्यांमध्ये लाखो लोकांनी नोकऱ्या गमावल्या आहेत. अशा परिस्थितीत जर एखाद्याचे उत्पन्न थांबले आणि कर्ज वाढले तर परिस्थिती आणखी कठीण होऊ शकते.

काय करावे?

  • खर्च मर्यादा निश्चित करा आणि Pay in Full हा पर्याय निवडा.
  • तुमचे मासिक बिल पूर्ण भरा.
  • जर खर्च वाढत असेल, तर तुमची कार्ड मर्यादा वाढवण्याचा किंवा EMI मध्ये रूपांतरित करण्याचा विचार करा.
  • तुमच्या खर्चावर नियमित लक्ष ठेवा.

Personal Finance सीरीजमधील या बातम्याही वाचा:

1. Personal Finance: 25,000 रुपये पगार असला तरी तुम्ही खरेदी करू शकता आलिशान कार आणि घर!

2. Personal Finance: SBI ते HDFC बँकेपर्यंत, सर्वात स्वस्त Home Loan कुठे मिळेल? व्याजदर आणि EMI सगळंच घ्या पाहून!

3. Personal Finance: तुम्ही Personal Loan घेऊन खरेदी करता फ्रिज, AC किंवा वॉशिंग मशीन, फायदा की नुकसान?

4. Personal Finance: चांदीबाबत मोठी अपडेट, खरेदीदारांनो तुम्हीही पडू शकता बुचकळ्यात!

5. Personal Finance तुम्हाला मिळतील 4 कोटी, फक्त SNP हा प्लॅन ठेवा लक्षात.. हाती येईल प्रचंड पैसा!

6. Personal Finance: FD पेक्षा जास्त मिळतील पैसे, 'ही' जबरदस्त योजना तुम्हाला माहिती आहे का?

7. Personal Finance: जर तुम्हाला घरबसल्या PF चे पैसे हवे तर फक्त 'एवढंच' करा.., थेट तुमच्या खात्यात पैसे

8. गुड न्यूज: तुमचा घराचा हप्ता होणार कमी, EMI भरताना 'एवढे' पैसे वाचणार!

9. Personal Finance: शेअर मार्केटचा बाजारच उठला, आता करावं तरी काय?

10. Personal Finance: ATM वापरलं की, तुमचे पैसे कापले जाणार, 1 मे पासून येणार नियम पाहून ठेवा बरं!

11. Personal Finance: 50,000 रुपये पगार असलेली लोकंही बनू शकतात करोडपती, फक्त 300...

12. Personal Finance: EPFO कडून मोठा दिलासा, PF मधून काढता येणार 5 लाख... तेही थेट UPI आणि ATM वापरून!

13. Personal Finance: 500 रुपयांच्या मासिक SIP ने किती दिवसांत होऊ शकता कोट्यधीश? संपूर्ण गणित घ्या समजून

14. SIP सारखी जबरदस्त कमाई आणि FD सारखे दर महिन्याला पैसे, SWP प्लॅन नेमका काय?

15. Personal Finance: गुंतवणुकीवर किती पैसे मिळणार हे सत्य कोणीही सांगत नाही, 70 चा फॉर्म्युला तुम्हाला टाकेल हादरवून!

16. Personal Finance: LIC ची रक्कम किती असावी? 'हा' फॉर्म्युला खूप फायदेशीर

हे वाचलं का?

    follow whatsapp