Personal Finance: Gold फंडमध्ये जबरदस्त कमाई, या 5 Fund मधून मिळवा सोन्यासारखा पैसा!
Gold Fund: गोल्ड फंडमधील गुंतवणूक ही आता एक चांगली गुंतवणूक ठरत आहे. जाणून घ्या याचविषयी सविस्तरपणे.
ADVERTISEMENT

Personal Finance Tips for Gold Fund: सोने नेहमीच सुरक्षित गुंतवणूक मानले गेले आहे. गेल्या काही वर्षांत सोन्याच्या किंमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. या वर्षी सोन्याच्या किंमतीत जवळपास 50% वाढ झाली आहे. बाजारात सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यापैकी एक म्हणजे गोल्ड फंड (Gold Fund). गोल्ड फंड म्हणजे म्युच्युअल फंड योजना ज्या सोने आणि सोन्याशी संबंधित मालमत्तांमध्ये गुंतवणूक करतात. त्या थेट एएमसी किंवा फंड हाऊसमधून खरेदी करता येतात. गेल्या दहा वर्षांत, पाच गोल्ड फंडने उत्कृष्ट परतावा दिला आहे आणि ते मजबूत परतावा देत राहतील अशी अपेक्षा आहे.
कमी खर्चात चांगले परतावे देणाऱ्या टॉप पाच गोल्ड फंडांमध्ये एचडीएफसी म्युच्युअल फंड (HDFC MF), एसबीआय म्युच्युअल फंड (SBI MF), एलआयसी म्युच्युअल फंड (LIC MF), अॅक्सिस म्युच्युअल फंड (Axis MF) आणि इन्व्हेस्को इंडिया म्युच्युअल फंड या योजनांचा समावेश आहे. गेल्या 10 वर्षात त्यांचे वार्षिक परतावे सुमारे 15% आहेत. महत्त्वाचे म्हणजे, या फंडचे खर्चाचे प्रमाण 0.10% ते 0.32% पर्यंत आहे, जे बरेच परवडणारे मानले जाते. या फंड्सचे रेटिंग देखील चांगले.
SBI गोल्ड फंड - डायरेक्ट प्लॅन
व्हॅल्यू रिसर्चने SBI गोल्ड फंडला 5-स्टार रेटिंग दिले आहे. त्याचा 10 वर्षांचा सरासरी वार्षिक परतावा (CAGR) 15.21% आहे. SBI गोल्ड फंडच्या खर्चाचे प्रमाण 0.10% आहे.
Axis गोल्ड फंड - डायरेक्ट प्लॅन
व्हॅल्यू रिसर्चने Axis गोल्ड फंड (डायरेक्ट प्लॅन) ला 5-स्टार रेटिंग दिले आहे. या फंडाचा 10 वर्षांचा सरासरी वार्षिक परतावा (CAGR) 15.29% आहे. या फंडाचा खर्च प्रमाण 0.17% आहे.