ठाकरे बंधूंना उद्या पुन्हा का जावं लागणार मंत्रालयात? संजय राऊतांनी सांगितली बैठकीच्या 'आतली' बातमी!
मतदार याद्या, निवडणूक याविषयी महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा करण्यासाठी राज्यातील विरोधी पक्ष हे मुख्य निवडणूक आयुक्त एस. चोकलिंगम यांची भेट घेतली. पण आता उद्या (15 ऑक्टोबर) पुन्हा एकदा विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळांना मंत्रालयात यावं लागणार आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: महाराष्ट्रातील विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी आज (14 ऑक्टोबर) मुख्य निवडणूक आयुक्त एस. चोकलिंगम यांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना (UBT)चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह काँग्रेस आणि इतर पक्षांच्या महत्त्वाच्या नेत्यांनी निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. मात्र ही बैठक आज पूर्णच झाली नाही. त्यामुळे आता उद्या (15 ऑक्टोबर) पुन्हा एकदा शिष्टमंडळ हे मंत्रालयात येणार आहे.
अवघ्या राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या या बैठकीतून आजच्या दिवशी काहीच तोडगा निघाला नाही. त्यामुळे आता उद्या पुन्हा एकदा शिष्टमंडळ चर्चा करणार आहे. दरम्यान, या बैठकीत नेमकं काय घडलं याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.
संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
'एस. चोकलिंगम यांच्या बरोबरच्या बैठकीतील काही मुद्दे हे अनिर्णीत आहेत. ती चर्चा उद्या परत सुरू राहणार आहे. उद्या राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आणि चोकलिंगम यांची एकत्रित भेट आणि चर्चा हे शिष्टमंडळ, यातील प्रमुख नेते घेतील. त्यामुळे उद्याच याबाबतची माहिती पत्रकारांना दिली जाईल.'
हे ही वाचा>> काँग्रेसला सोबत घ्यावं, अशी राज ठाकरेंची देखील इच्छा; संजय राऊत यांचं वक्तव्य
'शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे आज पत्रकार परिषदेसाठी येणार होते. पण चर्चा अपुरी आहे. त्यामुळे उद्या पुन्हा एकदा चोकलिंगम आणि दिनेश वाघमारे यांची एकत्र बैठक याच शिष्टमंडळाबरोबर होणार असल्यामुळे ती संपल्यावर तुम्हाला पत्रकार परिषदेची वेळ कळवली जाईल.'