भाजप महिला नेत्याच्या नवऱ्याचं 'स्पा'च्या नावनं कांड? दोन फ्लॅटवर न वापरलेले कंडोम जप्त अन् 9 महिला...
crime news : इमारतीच्या फ्लॅट नं. 112 मध्ये कार्यरत असलेल्या दोन्ही ठिकाणी वैश्यव्यवसायाच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना मोठं यश आलं आहे. या प्रकरणात 13 जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत, या प्रकरणात भाजप नेत्याशी संबंध असल्याचं बोललं जात आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
भाजप महिला नेत्याच्या नवऱ्याचं 'स्पा'च्या नावावर बलतंच कांड
वैश्यव्यवसायाच्या टोळीचा पर्दाफाश
Crime News : वाराणसीत एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. 'स्पा'च्या नावावर बलतंच कांड समोर आलं आहे. पोलिसांनी छापा टाकत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. पोलिसांनी बाजाराजवळच मेलडी स्पा आणि एका इमारतीच्या फ्लॅट नं. 112 मध्ये कार्यरत असलेल्या दोन्ही ठिकाणी वैश्यव्यवसायाच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना मोठं यश आलं आहे. या प्रकरणात 13 जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत, तसेच यात 9 महिलांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. छापा टाकलेल्या दोन्ही ठिकाणी भाजपच्या नेत्या शालीनी यादव यांचे पती अरुण यादव यांचा यात समावेश असल्याचं बोललं जात आहे. अरुण यांनी हे दोन्ही फ्लॅट भाडे तत्त्वावर दिले होते.
हे ही वाचा : “माहेरहून स्कॉर्पिओ आण नाहीतर...” हुंड्यासाठी सतत छळ अन् मारहाण, वकीलाच्या बायकोचा 'त्या' अवस्थेत आढळला मृतदेह!
एकाच वेळी दोन स्पा सेंटरवर छापे अन् वापरात न आलेले कंडोम सापडले
वाराणसीतील सिग्रा येथे SOG-2 पथकाने एकाच वेळी मेलडी स्पा आणि फ्लॅट क्रमांक 112 वर छापा टाकला होता. तेव्हा मेलडी स्पा येथून चार महिलांसह चार पुरुषांना अटक करण्यात आली होती. एकूण 23, 100 रुपये आणि न वापरण्यात आलेले कंडोम जप्त करण्यात आले. फ्लॅट क्रमांक 112 मधून पाच महिलांना अटक करण्यात आली. त्या देखील ठिकाणाहून न वापरण्यात आलेले कंडोम जप्त करण्यात आले होते. याच कारवाईच्या दरम्यान मेलडी स्पा आणि फ्लॅट जप्त करण्यात आला.
तपासानंतर, फ्लॅट क्रमांक 112 आणि मेलडी स्पा संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळावरून सीसीटीव्ही फुटेज देखील जप्त केले आहेत. मोबाईल डेटाचा देखील तपास केला. नंतर फॉरेन्सिक पुरावे जतन करण्यात आले आहेत.
हे ही वाचा : मुंबई: 15 वर्षांच्या मुलीचं 32 वर्षीय पुरुषाशी बळजबरीने लग्न! इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध... अखेर, पीडितेने हिंमत दाखवली अन्...
महिला भाजप नेत्या कोण?
दोन्ही स्पा सेंटर हे भाजप नेत्या शालीनी यादव यांचे पती अरुण यादव चालवत असल्याचा आरोप आहे. शालीनी यादव यांनी 2017 मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर वारासणी महापालिकेच्या महापौर पदाची निवडणूक लढवली होती. नंतर समाजवादी पक्षातून वाराणसीतून लोकसभा निवडणूक लढवली होती. नंतर आता 2023 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.










