बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टी हळहळली; डान्सर म्हणूनही संपूर्ण देशात सोडलेली छाप
veteran actress madhumati passes away : बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टी हळहळली; डान्सर म्हणूनही संपूर्ण देशात सोडलेली छाप
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टी हळहळली

डान्सर म्हणूनही संपूर्ण देशात सोडलेली छाप
veteran actress madhumati passes away :दिग्गज अभिनेत्री आणि डान्सर मधुमती यांचं निधन झालं आहे. वयाच्या 87 व्या वर्षी त्यांनी आपल्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. अनेक कलाकारांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण केली आहे. मधुमती यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक संस्मरणीय चित्रपट केले आहेत. ज्यामध्ये “आंखें”, “टॉवर हाऊस”, “शिकारी” आणि “मुझे जीने दो” यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. त्या एक अप्रतिम डान्सर होत्या आणि त्यांनी भरतनाट्यम, कथक, मणिपुरी आणि कथकली अशा शास्त्रीय नृत्यप्रकारांचे शिक्षण घेतले होते.
अभिनेता अक्षय कुमारने वाहिली श्रद्धांजली
विंदू दारा सिंग यांनीही मधुमतींचा एक सुंदर फोटो शेअर करत लिहिले ,“आमच्या गुरू आणि मार्गदर्शक मधुमतीजींच्या आत्म्यास शांती लाभो. आमच्यापैकी अनेकांनी या महान व्यक्तिमत्त्वाकडून डान्स शिकला आणि त्यांच्या प्रेम व आशीर्वादाने समृद्ध असे सुंदर आयुष्य जगलो.”
हेही वाचा : सुनेचा मृतदेह पाहाताच मोठा धक्का बसला, सासूनेही जागेवर जीव सोडला, संपूर्ण गाव हळहळलं
मधुमती यांच्या निधनावर अभिनेता अक्षय कुमार आणि विंदू दारा सिंग यांसारख्या अनेक कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे. अक्षय कुमार यांनी ‘एक्स’वर एक जुना फोटो शेअर करत लिहिले ,“माझ्या पहिल्या गुरूला श्रद्धांजली. नृत्याविषयी जे काही शिकलोय, ते सर्व त्यांच्या पायाशी राहून शिकलो. प्रत्येक अदा, माझ्या प्रत्येक कलाकृतीत तुमची आठवण कायम राहील. ओम शांती.”