VIDEO : केबीसीमधील स्पर्धक अमिताभ बच्चन यांच्याशी उर्मटपणे बोलला, अतिआत्मविश्वास नडला, 5 व्या प्रश्नाला बाहेर
kbc junior contestant misbehaved with amitabh bachchan : केबीसीमधील स्पर्धक अमिताभ बच्चन यांचा आदरही करेना, अतिआत्मविश्वासाने तोंडावर आपटला
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

केबीसीमधील स्पर्धक अमिताभ बच्चन यांचा आदरही करेना

अतिआत्मविश्वासाने तोंडावर आपटला
kbc junior contestant misbehaved with amitabh bachchan : टीव्हीवरील सर्वात प्रसिद्ध शो 'कौन बनेगा करोड़पती' प्रेक्षकांचा नेहमीच आवडता शो राहिला आहे. सध्या या शो च्या 17 व्या सिझनला सुरुवात झाली आहे. अनेक स्पर्धक या शोमधून करोडपती बनून गेले आहेत. या सिझनला देखील प्रेक्षकांनी खूप पसंती दिली आहे, कारण शोचे होस्ट आणि बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा अंदाज प्रेक्षकांना विशेष आवडतो. दरम्यान, काही दिवसांपूर्वीचा एक एपिसोड खूप चर्चेत राहिला आहे. शोमध्ये आलेला एका मुलगा अमिताभ बच्चन यांच्याशी उर्मटपणे बोलत होता, त्यामुळे नेटकरी संताप व्यक्त करत आहेत.शिवाय, अतिआत्मविश्वासही या स्पर्धकाला नडल्याचं पाहायला मिळालं. कारण त्याला 4 प्रश्नांची बरोबर उत्तरं देता आली. मात्र, पाचव्या प्रश्नावेळीच त्याच्यावर बाहेर पडण्याची वेळ आली.
काही दिवसांपूर्वी शूट झालेल्या एपिसोडमध्ये 'कौन बनेगा करोड़पति 17' या शो मध्ये गुजरातचा एक विद्यार्थी इशित हॉट सीटवर बसला. हॉट सीटवर पोहोचताच इशित खूप उत्साही दिसला. त्याचा उत्साह पाहून सुरुवातीला प्रेक्षकांना वाटले की मुलगा खूप प्रतिभावान आहे. पण गेम सुरू होताच मुलाने अमिताभ बच्चन यांच्याशी उर्मटपणे बोलण्यास सुरुवात केली.
अमिताभ बच्चन यांना दाखवला अॅटीट्यूड
हॉट सीटवर बसलेल्या इशितला शोचे होस्ट अमिताभ बच्चन यांनी विचारले की त्याला कसे वाटत आहे. यावर इशित म्हणतो, "मी खूप उत्साहित आहे. पण आपण सरळ पॉईंटवर येऊ या. मला गेमचे नियम समजावून सांगायची गरज नाही, कारण मला शोचे नियम आधीपासून माहीत आहेत." हे ऐकून अमिताभ बच्चन यांना देखील हसू आवरेना.
यानंतर प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतर अमिताभ बच्चन हसत पुढे जातात आणि खेळ सुरू ठेवतात. प्रश्नांचे उत्तर सांगत असताना मुलगा अमिताभ बच्चन यांचं बोलणं पूर्ण होण्याआधीच मध्येच बोलायला लागतो. अनेक वेळा बिग बी या वागणुकीकडे दुर्लक्ष करतात. पण अखेर हा मुलगा अतिआत्मविश्वासाने तोंडावर आपटतो. त्याला 5 व्या प्रश्नाचे योग्य उत्तर देता येत नाही.