'...नाहीतर धाराशिवमध्ये येऊ देणार नाही', ठाकरेंच्या आमदाराने मंत्री प्रताप सरनाईकांची गाडी अडवून जाब विचारला

मुंबई तक

MLA Kailasa Patil and Pratap Sarnaik : '...नाहीतर धाराशिवमध्ये येऊ देणार नाही', ठाकरेंच्या आमदाराने मंत्री प्रताप सरनाईकांची गाडी अडवून जाब विचारला

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

ठाकरेंच्या आमदाराने मंत्री प्रताप सरनाईकांची गाडी अडवून जाब विचारला

point

140 कोटींच्या विकासकामांवरुन राजकीय संघर्ष उफाळला

धाराशिव : शहरातील 140 कोटींच्या विकासकामांवरुन राजकीय संघर्ष उफाळला आहे. निविदा प्रक्रिया अद्याप पूर्ण न झाल्याने आणि कामे सुरू न झाल्याने महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची गाडी अडवून त्यांना जाब विचारला. आमदार कैलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आक्रमक आंदोलनात कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केलाय.

"नाहीतर धाराशिवमध्ये येऊ देणार नाही, काळे झेंडे दाखवू"

"डॅशिंग पालकमंत्री म्हणून तुमची निवड झाली आहे, पण शब्द पाळा. नाहीतर धाराशिवमध्ये येऊ देणार नाही, काळे झेंडे दाखवू. साहेब, तुम्ही जिल्ह्याची वाट लावत आहात, जनतेला न्याय पाहिजे आहे", असं म्हणत ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी प्रताप सरनाईक यांच्यासमोर संताप व्यक्त केला. यावर सरनाईक यांनी कार्यकर्त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र आक्रमक कार्यकर्ते ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. शेवटी सरनाईक चिडून गाडीत बसले आणि जाताना उपरोधाने म्हणाले की, तुमच्या नेत्यांनाही सांगा, आपापसात भांडणे कमी करा म्हणजे माझ्या डोक्याचा ताप कमी होईल.

हेही वाचा : Personal Finance: दिवाळीत सोने खरेदीचा विचार? पण तुम्हाला घरात फक्त 'एवढंच' सोनं ठेवण्याची मर्यादा, पण...

दरम्यान, धाराशिव शहरातील विविध विकास कामांसाठी 140 कोटींची निविदा काढण्यात आल्या होत्या. महाविकास आघाडीने या निविदेविरोधात पाच दिवस उपोषण केले होते. त्या वेळी पालकमंत्री सरनाईक यांनी अंदाजपत्रकीय दराने निविदा करण्याचे किंवा फेरनिविदा काढण्याचे आश्वासन दिले होते. फेब्रुवारी 2025 मध्ये त्यांनी पुन्हा आश्वासन दिले होते की कामे आठ दिवसांत सुरू होतील. मात्र ऑक्टोबरपर्यंतही कामांची सुरुवात झालेली नाही. त्यामुळे महाविकास आघाडीने सरनाईक यांना तुम्ही दिलेल्या आश्वासनाची पूर्तता कधी होणार? असा थेट जाब विचारला.

हे वाचलं का?

    follow whatsapp