सासूचा फक्त 'तो' निर्णय आवडला नाही म्हणून दिली सुपारी... पण, अखेर गेम पलटला अन् घडली भयानक घटना
एका सुनेने सासूच्या हत्येची सुपारी दिल्याचं सांगितलं जात आहे. आरोपी महिलेने तिच्या सासूची हत्या करण्यासाठी 1.50 लाख रुपयांची सुपारी दिली होती.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

सासूचा 'तो' निर्णय आवडला नाही म्हणून दिली सुपारी

अखेर गेम पलटला अन् घडली भयानक घटना
Crime News: उत्तर प्रदेशातील मेरठ येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका सुनेने सासूच्या हत्येची सुपारी दिल्याचं सांगितलं जात आहे. आरोपी महिलेने तिच्या सासूची हत्या करण्यासाठी 1.50 लाख रुपयांची सुपारी दिली होती, पण सुदैवाने या सगळ्यातून पीडिता वाचली. आता या प्रकरणासंबंधी पोलिसांनी तीन तरुणांनी अटक केल्याची माहिती आहे.
संपत्तीच्या कारणावरून रचला भयानक कट
खरंतर, प्रकरणातील पीडिता ही आरोपी महिलेची सावत्र सासू असल्यामुळे सुनेला भीती अशी होती की सासूची संपत्ती तिच्या सख्ख्या मुलांमध्ये वाटली जाईल. म्हणून, आरोपी सुनेने तिच्या सासूला संपवण्याचा एक भयानक कट रचला. पण, या सगळ्यात तिचा हत्येचा कट उघडकीस आला आणि ती पकडली गेली.
सासूची हत्या करण्यासाठी सुपारी दिली अन्...
रिपोर्ट्सनुसार, आरोपी महिलेचं नाव कोमल असून ती तिला तिची सावत्र सासू सीमा देवी हिच्यावर प्रचंड राग होता. कारण, सीमाने एक मूल दत्तक घेण्याची इच्छ व्यक्त केली होती. त्यानंतर, मुलाच्या येण्याने मालमत्तेतील तिचा वाटा कमी होईल अशी कोमलला भीती होती. त्यामुळेच, आरोपी महिलेने तिच्या सावत्र सासूची हत्या करण्यासाठी सुपारी दिली.
आपल्या भावासोबत मिळून कोमलने तिच्या सासूच्या हत्येचा कट रचला. तिने त्याच्या भावाला सासूची हत्या करण्यासाठी दीड लाख रुपये देण्याचं आश्वासन दिलं. 12 ऑक्टोबर रोजी, आरोपी महिलेचा भाऊ भव्य मास्क घालून सरधना येथील बहिणीच्या घरात घुसला आणि त्याने सीमा देवीवर गोळी झाडली. त्यावेळी, ती गोळी पीडितेच्या पायाला लागली आणि ती गंभीररित्या जखमी झाली. मात्र, या सगळ्यात सासूचा जीव वाचला.