48 वर्षांपूर्वी मुंबईमध्ये महिलेवर चाकूने केला हल्ला, आरोपी कोकणात लपून बसला, पोलिसांनी 71 व्या वर्षी केलं अटक

मुंबई तक

mumbai crime : मुंबईतील लालबाग परिसरात एका व्यक्तीने गेल्या 48 वर्षांपूर्वी एका महिलेवर चाकूने हल्ला केला होता. त्या व्यक्तीला वयाच्या 71 व्या वर्षी अटक करण्यात पोलिसांनी यश आले आहे.

ADVERTISEMENT

mumbai crime
mumbai crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

48 वर्षांपूर्वी केला गुन्हा

point

71 व्या वर्षी व्यक्ती अटक

mumbai crime : मुंबईतील लालबाग परिसरात एका व्यक्तीने गेल्या 48 वर्षांपूर्वी एका महिलेवर चाकूने हल्ला केला होता. त्या व्यक्तीला वयाच्या 71 व्या वर्षी अटक करण्यात पोलिसांनी यश आले आहे. रत्नागिरीच्या दापोली तालुका येथील एका गावातून त्यांना अटक करण्यात आली होती, जिथे ते गेल्या अनेक वर्षांपासून एकांतात राहत होता. आरोपी व्यक्तीचं नाव चंद्रशेखर कालेकर असे आहे. 

हे ही वाचा : मुंबईतील राम मंदिर स्टेशनवर महिलेची प्रसुती करणारा तरूण महाराष्ट्रातील कोणत्या तालुक्यातला? रोहित पवारांकडून कौतुकांचा वर्षाव

प्रकरण काय? 

पोलिसांच्या म्हणण्यांनुसार, कालेकर यांच्यावर 1977 मध्ये मुंबईच्या लालबाग परिसरात एका महिलेवर चाकूने हल्ला केल्याचा आरोप आहे. तेव्हा त्यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला, परंतु कायदेशीर नोटिसांना उत्तर न देता तो अचानकपणे गायब झाला. त्यानंतर त्यांनी मुंबईच्या अनेक उपनगरांमध्ये आणि ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी राहून त्यांना अटक करण्यात आली होती. 

पोलिसांकडून जुन्या फाईल्सची तपासणी 

मुंबई पोलिसांनी फरार असलेल्यांच्या जुन्या फाईल्सची तपासणी सुरु केली. या प्रक्रियेदरम्यान, कालेकर यांचे नाव समोर आले. अधिकाऱ्यांनी मतदार याद्या, सरकारी नोंदी आणि मानवी गुप्तचर स्त्रोतांचा वापर करून त्या व्यक्तीची कसून चौकशी करत शोधाशोध केली. अनेक महिलांनी शोध घेतला, असे एका वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. मतदार याद्या आणि स्थानिक रहिवाशांकडून गोळा केलेल्या माहितीच्या आधारे, तो रत्नागिरीतील एका छोट्या गावातील झोपडीत राहत असल्याचे आढळून आले. स्वत:ला एकांतवासी म्हणून त्यांची ओळख होती. तसेच ते गावातील फार कमी लोकांशी बोलताना दिसायचे. 

हे ही वाचा : ऑक्टोबर महिन्यात दिवाळीच्या तोंडावर ग्रहांची हालचाल, 'या' राशीतील लोकांवर संकट कोसळणार?

कालेकरला अटक

मंगळवारी सकाळी पोलिसांच्या पथकाने दापोली येथे छापा टाकण्यात आला आणि कालेकरला अटक करण्यात आली. तो त्याच्या घराबाहेर बसला होता, त्याचक्षणी पोलीस त्या ठिकाणी आले आणि पोलिसांना पाहून त्या व्यक्तीचा आश्चर्याचा धक्का बसला होता. व्यक्तीला अटक केल्यानंतर त्याला मुंबईमध्ये आणण्यात आले होते, जुन्या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रांचा वापर करून त्याची ओळख पटवण्यात आली. 

हे वाचलं का?

    follow whatsapp