Ïmpact feature: अभय भुतडा फाउंडेशनतर्फे महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी सीएम रिलीफ फंडला 5 कोटी रुपयांची देणगी
अभय भुतडा फाउंडेशनने महाराष्ट्रातील पुरग्रस्त भागांना मदत करण्यासाठी ₹8 कोटींचे योगदान जाहीर केले आहे. यापैकी ₹5 कोटींची रक्कम महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात आली.
ADVERTISEMENT

मुंबई: एकतेचा आणि करुणेचा सामर्थ्यशाली संदेश देत, अभय भुतडा फाउंडेशनने महाराष्ट्रातील पुरग्रस्त भागांना मदत करण्यासाठी ₹8 कोटींचे योगदान जाहीर केले आहे. यापैकी ₹5 कोटींची रक्कम महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात आली असून, राज्यभरातील भीषण पुरानंतर तत्काळ मदत आणि पुनर्वसनाच्या कामांसाठी ही मदत उपयोगात आणली जाणार आहे.
उद्योजक, परोपकारी आणि अभय भुतडा फाउंडेशनचे अध्यक्ष सीए अभय भुतडा यांनी स्वतः मुंबईत महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ₹5 कोटींचा धनादेश सुपूर्द केला. या मदतीबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली आणि राज्य सरकारच्या पुनर्वसन उपक्रमांना गती देण्यासाठी या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिलेल्या मदतीव्यतिरिक्त, या फाउंडेशनतर्फे मराठवाड्यातील पूरग्रस्त भागात कार्यरत असलेल्या स्थानिक संस्थांना ₹3 कोटींचे योगदान दिले आहे. पुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्यांचे घर, उपजीविका आणि आशेचा पुनर्निर्माण करण्यासाठी मदत करणे, हे या मदतीचे उद्दिष्ट आहे.