नांदेड हादरलं, अनैतिक संबंध टिकवण्यासाठी पत्नीचं मोठं कांड, प्रियकराच्या मदतीने पतीला जिवंत नदीत फेकलं
Nanded Crime : नांदेड हादरलं, प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीला जिवंत नदीत फेकलं; 1.5 महिन्यांनी घटना उलगडली
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

अनैतिक संबंध टिकवण्यासाठी पत्नीचं मोठं कांड

प्रियकराच्या मदतीने पतीला जिवंत नदीत फेकलं
Nanded Crime : नांदेडमधून धक्कादायक घटना समोर आलीये. अनैतिक संबंध टिकवण्यासाठी पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढलाय. विशेष म्हणजे पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला जिवंत असतानाच नदीत फेकलंय. दरम्यान, या घटनेचा उलगडा दीड महिन्यांनंतर झालाय. ही घटना नांदेड जिल्ह्यातील किनवटमध्ये घटलीये.
दारूच्या नशेत असलेल्या पतीला नदीच्या पुलावरून फेकून दिले
अधिकची माहिती अशी की, किनवट तालुक्यात अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा काटा काढण्यासाठी पत्नीने प्रियकराच्या मदतीने कट रचला. दारूच्या नशेत असलेल्या पतीला पैनगंगा नदीच्या पुलावरून जिवंत फेकून दिले होते. तब्बल दीड महिन्यानंतर किनवट पोलिसांनी या खुनाच्या प्रकरणाचा लावला छडा आणि पत्नी आणि तिच्या प्रियकराला ठोकल्या बेड्या.
किनवटच्या सिंदगी (मो.) येथील मूळ रहिवासी मात्र, गोकुंदा येथे वास्तव्यास असलेले विनोद किशन भगत (वय 51) यांचा संसार सुरू होता. त्याचवेळी त्यांची पत्नी प्रियंका हिचे किनवट शहरातील शेख रफीक याच्यासोबत अनैतिक संबंध जुळले. पती विनोद भगत या संबंधात अडथळा ठरत होता. त्यामुळे पत्नी प्रियंका आणि प्रियकर शेख रफीक यांनी संगनमत करुन कट रचला. 29 ऑगस्ट रोजी रात्रीच्या वेळी दारूच्या नशेत असलेल्या विनोद भगत यास मराठवाडा-विदर्भाला जोडणाऱ्या पैनगंगा नदीवरील खरबी पुलावरून जिवंत फेकून दिले. यानंतर मयताची पत्नी प्रियंका हिने 3 सप्टेंबर 2025 रोजी किनवट पोलिस ठाण्यात पती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.
दरम्यान, हत्या झालेल्या पतीच्या बहिणींनी भावाचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला. हाच धागा पकडून पोलिस निरीक्षक देवीदास चोपडे यांच्या पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान, फिर्यादी असलेल्या पत्नीच्या मोबाइलमधील एका क्रमांकावर वारंवार झालेले कॉल पोलिसांना संशयास्पद वाटले. त्या नंबरच्या व्यक्तीला (प्रियकर शेख रफीक) ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि खुनाचे रहस्य उघड झाले. पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील आणि उपविभागीय पोलिस अधिकारी रामकृष्ण मळघणे यांच्या तपासामुळे हा सर्व प्रकार उघडकीस आलाय