नव्या नवरीसोबत केलं भयंकर कृत्य, डॉक्टर नवऱ्याचं गुपित तब्बल 6 महिन्यांनी आलं समोर
बंगळुरूमधील एका डॉक्टरने लग्नाच्या अकरा महिन्यातच आपल्या पत्नीची अत्यंत थंड डोक्याने हत्या केली होती. या हत्येबाबत तब्बल सहा महिन्यांनी खरी माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT

बंगळुरू: बंगळुरूच्या प्रसिद्ध व्हिक्टोरिया हॉस्पिटलमधील ही घटना चित्रपटातील कथेसारखी वाटेल, परंतु ती एक सत्यकथा आहे. एका डॉक्टर पतीने हुशारीने त्याच्या पत्नीची हत्या केली, जी स्वतः डॉक्टर होती. त्यांचं लग्न होऊन केवळ 11 महिने झाले होते. पण आता प्रश्न उद्भवतो की, डॉक्टरने असं का केलं?
डॉ. कृतिका रेड्डी ही व्हिक्टोरिया हॉस्पिटलमध्ये त्वचारोगतज्ज्ञ (डर्मेटोलॉजिस्ट) होती. तिचा पती डॉ. महेंद्र रेड्डी हा त्याच हॉस्पिटलमध्ये जनरल सर्जन होता. कृतिका ही मागील काही काळापासून आजारी होती, म्हणून ती तिच्या वडिलांच्या घरी म्हणजे माहेरीच राहत होती. या दरम्यान, तिचा पती महेंद्रही तिला वारंवार भेटायला येत असे. त्यावेळी सर्वांना वाटायचं की, तो आपल्या पत्नीची म्हणजेच कृतिकाची विचारपूस करण्यासाठी येत असावा, परंतु वास्तव काहीतरी वेगळेच होते.
अचानक बिघडली कृतिकाची तब्येत
दोन दिवसांपासून महेंद्रने कृतिकाला IV इंजेक्शन्स दिले. ते देताना त्याने सांगितलं होतं की, तिच्या आरोग्यासाठी ही इंजेक्शन्स चांगली आहेत. पण, 23 एप्रिलच्या रात्री कृतिकाची तब्येत अचानक बिघडली. त्यामुळे तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. त्यावेळी पोलिसांनी हा अनैसर्गिक मृत्यू मानून UDR नोंदवला.
हे ही वाचा>> सासूचं आणि जावयाचं होतं लफडं, संबंध ठेवल्याचे व्हिडिओही बनवले, नंतर पत्नीसह तिच्या आईने नको तेच...
दरम्यान, तब्बल सहा महिन्यांनंतर, फॉरेन्सिक अहवालातून सत्य बाहेर आलं. अहवालात नमूद करण्यात आलं होतं की, कृतिकाच्या शरीरात प्रोपोफोल नावाचे भूल देणारे औषध आढळले. हे तेच औषध जे फक्त शस्त्रक्रियागृहात रुग्णांना भूल देण्यासाठी अत्यंत अल्प प्रमाणात वापरले जाते. पण फॉरेन्सिक रिपोर्टमधून स्पष्टपणे दिसून आले की, कृतिकाला हे औषध जाणूनबुजून देण्यात आले होते.