चार मुलं झाली, आर्थिक समस्यांनी हैराण, आईने दोन दिवसांच्या बाळाला 50 हजाराला... संतापजनक प्रकार
एका महिलेने तिच्या दोन दिवसांच्या नवजात बाळाला 50 हजार रुपयांत विकल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

आईने दोन दिवसांच्या बाळाला 50 हजाराला विकलं

आई का बनली आपल्याच बाळाची शत्रू?
Crime News: ओडिशाच्या सुंदरगढ जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका महिलेने तिच्या दोन दिवसांच्या नवजात बाळाला विकल्याचं सांगितलं जात आहे. महिलेने 50 हजार रुपयांत तिच्या नवजात बाळाला विकल्याची माहिती आहे. नेमकं प्रकरण काय?
नवजात बाळाला 50 हजार रुपयांत विकलं
संबंधित घटना सुंदरगढ जिल्ह्यातील कोइडा ब्लॉकच्या पटामुंडा गावात घडल्याचं सांगण्यात येत आहे. येथील रहिवासी असलेल्या एका महिलेने तिच्या दोन दिवसांच्या नवजात बाळाला 50 हजार रुपयांत विकलं. यामधून 25 हजार रुपये महिलेला अॅडवान्स मिळाले होते. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली. ही घटनेची माहिती गावकऱ्यांमध्ये पसरताच संबंधित महिला घरातून गायब झाली आणि तिने तिचा मोबाईल फोन सुद्धा बंद केला.
चार मुलांचे पालनपोषण करण्यास असमर्थ ...
स्थानिक आशा वर्कर्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने तिचं बाळ कोणा दुसऱ्यालाच दिल्याचं तिने स्वत: कबूल केलं. घरात आर्थिक अडचण असल्याकारणाने ती तिच्या चार मुलांचे पालनपोषण करण्यास असमर्थ होती, असं तिने सांगितलं. या नाईलाजाने तिने हे टोकाचं पाऊल उचललं असल्याचं सांगण्यात येत आहे. महिला यापूर्वी कोइडा मॅटरनिटी वेटिंग होममध्ये कार्यरत असून तिला काही काळानंतर, राउरकेला सरकारी रुग्णलयात पाठवण्यात आलं. त्याच रुग्णालयात तिने तिच्या बाळाला जन्म दिला. मात्र, बाळाच्या जन्मानंतर केवळ दोन दिवसांनंतरच महिलेने आपल्या बाळाला विकलं.
हे ही वाचा: विरार: प्रियकराने अश्लील फोटो दाखवून ब्लॅकमेल केलं... वडिलांना मारहाण! नैराश्यातून तरुणीने उचललं टोकाचं पाऊल
अंगणवाडी कर्मचाऱ्याने दिली माहिती
ही बातमी प्रशासनाकडे पोहोचताच बाल कल्याण विभागाने तातडीने तपास सुरू केला. आता त्या महिलेसह ज्या व्यक्तीने बाळाला विकत घेतलं, त्याचा देखील शोध घेतला जात आहे. अंगणवाडीच्या महिला कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेच्या पतीचं निधन झालं होतं. तसेच, तिला आधीच चार मुलं आहेत. तिने तिच्या गरोदरपणाची माहिती दिली असून याबाबत नोंदणी सुद्धा झाली होती, पण ती वारंवार तिचं राहण्याचं ठिकाण बदलत राहिली. अखेर, त्या कर्मचाऱ्याने तिच्या एका आईच्या घरी महिलेच्या राहण्याची व्यवस्था केली आणि तिथून तिला रुग्णालयात पाठवण्यात आलं.