मोबाईल फोडला म्हणून मुलगी 'असं' करेल याची कोणीच कल्पना केली नव्हती; हातावर मेहंदी अन्...
Crime News : एका 14 वर्षांच्या मुलीनं तिच्या वाढदिवसादिवशीच आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. तिचा वाढदिवस असल्याने ती असं काहीतरी करेल याची कल्पना कोणालाच आली नव्हती. खुशबू असं या मुलीचं नाव असून ती आठवीत शिकत होती. खुशबू ही तिच्या तीन बहिणी आणि एका भावामध्ये सर्वात मोठी होती. अभ्यासात हुशार असलेल्या खुशबूने वाढदिवसानिमित्त हातावर मेहंदीही काढली होती. तिचा मोबाईल फोन फोडल्याने तिनं हे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मोबाईल फोडला म्हणून मुलगी 'असं' करेल याची कोणीच कल्पना केली नव्हती
हातावर मेहंदी अन्...
Crime News : एका 14 वर्षांच्या मुलीनं तिच्या वाढदिवसादिवशीच आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. तिचा वाढदिवस असल्याने ती असं काहीतरी करेल याची कल्पना कोणालाच आली नव्हती. खुशबू असं या मुलीचं नाव असून ती आठवीत शिकत होती. खुशबू ही तिच्या तीन बहिणी आणि एका भावामध्ये सर्वात मोठी होती. अभ्यासात हुशार असलेल्या खुशबूने वाढदिवसानिमित्त हातावर मेहंदीही काढली होती. बिहारच्या सारम जिल्ह्यातील ही घटना आहे.
हे ही वाचा : लघुशंकेसाठी बसमधून खाली उतरले, अन् समोरून आलेल्या टँकरने चिरडलं, 6 जणांचा मृत्यू
वर्षभरापूर्वीच आईचे निधन
खुशबूचे वडील हिरालाल शर्मा हे व्यवसायाने प्लंबर असून घटनेच्या वेळी ते कामासाठी शेजारील गावात गेले होते. घरात लहान मुले खेळत असताना शेजाऱ्यांना खुशबूच्या ओरडण्याचा आवाज आला. त्यांनी तातडीने धाव घेत तिला खाली उतरवले आणि पोलिसांना माहिती दिली. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. खुशबूच्या आईचे वर्षभरापूर्वीच आजारपणामुळे निधन झाले होते, तेव्हापासून घराची मोठी जबाबदारी खुशबूच्या खांद्यावर आली होती.
मोबाईल फोडल्यामुळे उचलले टोकाचे पाऊल?
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, आत्महत्येच्या एक दिवसापूर्वी कोणत्यातरी कारणावरून खुशबूचा मोबाईल फोन तोडण्यात आला होता आणि तिला रागावले देखील होते. या रागातून किंवा घरगुती मानसिक तणावातून तिने हे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. अमनौर पोलीस स्टेशनचे प्रमुख आणि एफएसएल (FSL) टीमने घटनास्थळाची पाहणी करून पुरावे गोळा केले आहेत.










