आधी ट्रान्सजेंडरवर बलात्कार आणि नंतर ब्लॅकमेलिंग, 24 ट्रान्सजेंडरने फिनाईल पिऊन... हादरवून टाकणारं प्रकरण

मुंबई तक

crime news : 24 ट्रान्सजेंडरनी फिनाइल प्यायल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे. यामागचं नेमकं कारण काय असावं याची माहिती समोर आली आहे.

ADVERTISEMENT

24 transgenders drank phenyl after first raping and then blackmailing them
24 transgenders drank phenyl after first raping and then blackmailing them
social share
google news

बातम्या हायलाइट

point

24 ट्रान्सजेंडरनी फिनाईल प्यायल्याचा धक्कादायक प्रकार

point

पायल गुरु आणि सपना हाजी गटात दिर्घकाळापासून वाद सुरु

point

ट्रान्सजेंडरवर बलात्कार करून नंतर ब्लॅकमेलिंग

crime news : मध्य प्रदेशातील इंदूरमधील 24 ट्रान्सजेंडरनी फिनाइल प्यायल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे. यामागचं नेमकं कारण काय असावं याची माहिती समोर आली आहे. पायल गुरु आणि सपना हाजी गटांतील सुरु असणाऱ्या दिर्घकाळ वादातूनच ही घटना घडली आहे. यात एका ट्रान्सजेंडरवर बलात्कार करून नंतर ब्लॅकमेलिंग करण्यात आली होती. 

हे ही वाचा : मुंबईतील राम मंदिर स्टेशनवर महिलेची प्रसुती करणारा तरूण महाराष्ट्रातील कोणत्या तालुक्यातला? रोहित पवारांकडून कौतुकांचा वर्षाव

ट्रान्सजेंडर गटात दिर्घकाळापासून वाद 

या संबंधित प्रकरणात नंदलालपुरा आणि एमआर-10 भागात पायल गुरु आणि सपना हाजी या ट्रान्सजेंडर गटात दिर्घकाळापासून वाद सुरु होता. या प्रकरणावर आता पंढरीनाथ पोलिसांच्या म्हणण्यांनुसार, पंकज एक कथित पत्रकार आणि त्याचा सहकारी, अक्षय या दोघांमध्ये वाद उफळल्याचा फायदा घेत गटाशी संपर्क साधला. त्यांनी पत्रकार असल्याचा दावा केला आणि त्यांना बदनामा करण्याची धमकी देण्यात आली आणि पैसेही मागितले. 

ट्रान्सजेंडर महिलेला जबरदस्तीने इमारतीत नेले...

जेव्हा तिने पैसे देण्यास नकार दिला तेव्हा आरोपी पंकजने एका ट्रान्सजेंडर महिलेला जबरदस्तीने एका इमारतीत नेण्यात आले. त्यानंतर तिचं लैंगिक शोषण करण्यात आले, तिने पोलीस ठाण्यात तक्रार दिली तर तिच्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्यात आली. या छळाला कंटाळून एका गटातील 24 ट्रान्सजेंडर महिलांनी फिनाईल पिऊन स्वत:चेच जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. 

हे ही वाचा : 48 वर्षांपूर्वी मुंबईमध्ये महिलेवर चाकूने केला हल्ला, आरोपी कोकणात लपून बसला, पोलिसांनी 71 व्या वर्षी केलं अटक

इतर काही ट्रान्सजेंडर लोक परतले तेव्हा एकच गोंधळ उडाला. त्याचक्षणी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत, दरवाजा तोडला आणि सर्वांना ऑटो, रुग्णवाहिका आणि पोलिसांच्या वाहनांमधून एमवाय हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. सध्या सर्वांचीच प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकरणात आरोपींचा शोध सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp