"आधी अपहरण, बलात्कार अन् नंतर हत्या..." नर्सिंगच्या विद्यार्थीनीसोबत नेमकं काय घडलं?

मुंबई तक

एका नर्सिंगच्या विद्यार्थीनीची निर्घृण हत्या करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. पीडितेवर बलात्कार करुन नंतर, तिची हत्या करण्याचा आरोपी तरुणीच्या वडिलांनी केला आहे.

ADVERTISEMENT

नर्सिंगच्या विद्यार्थीनीसोबत नेमकं काय घडलं?
नर्सिंगच्या विद्यार्थीनीसोबत नेमकं काय घडलं?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

"आधी अपहरण, बलात्कार अन् नंतर हत्या..."

point

नर्सिंगच्या विद्यार्थीनीसोबत नेमकं काय घडलं?

Crime News: एका नर्सिंगच्या विद्यार्थीनीची निर्घृण हत्या करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. संबंधित घटना ही राजस्थानच्या थैरथल-तिजारा येथील मुंडावर मध्ये घडली. पीडितेवर बलात्कार करुन नंतर, तिची हत्या करण्याचा आरोपी तरुणीच्या वडिलांनी केला आहे. आता, पोलिसांनी आरोपीला अटक केली असून संतप्त कुटुंबियांनी आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

बलात्कार आणि हत्येचा आरोप 

पीडितेच्या वडिलांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, माझ्या दोन्ही मुली नर्सिंग डिप्लोमाचं शिक्षण घेत असून सकाळी 10 वाजता त्या मुंडावरला क्लाससाठी आल्या होत्या. धाकटी मुलगी घराबाहेर गेल्यानंतर, आरोपी तरुणाने मोठ्या मुलीचं अपहरण केलं आणि तिला त्याच्या घरात घेऊन गेला. त्यानंतर, आरोपी तरुणाने तिच्यावर बलात्कार केला आणि त्यानंतर, तिचा गळा चिरून तिची निर्दयी हत्या केली. पोलीस ठाण्याबाहेरच ही घटना घडली. 

हे ही वाचा: चार मुलांची आई प्रियकरासोबत झाली फरार! नंतर, स्वत:च पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली अन्... नेमकं प्रकरण काय?

पोलिसांचा तपास 

लोकांना या घटनेबद्दल कळताच, स्थानिकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं. पोलिसांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली आणि घटनास्थळी पोहोचून पोलिसांनी तपास सुरू केला. एफएसएल टीमने सुद्धा पुरावे गोळा करण्यास सुरूवात केल्याची माहिती आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी तरुण हरियाणाच्या महेद्रगढ जिल्ह्यातील दूंगडा गावात राहत असून 21 वर्षीय उपेंद्र कुमार अशी त्याची ओळख समोर आली आहे. उपेंद्र मुंडावर येथे शेअर मार्केटचं काम करत असून तिथे तो भाडेतत्त्वार राहत होता. 

हे ही वाचा: अनैतिक संबंधाचा संशय पण भयानक सस्पेन्स, शेवटच्या क्षणापर्यंत खिळवून ठेवणारा मल्याळम सिनेमा, IMDb वर 7.3 रेटिंग

पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, मेडिकल बोर्डाने केलेल्या पोस्टमॉर्टम तपासणीनंतर, मृतदेह कुटुंबियांकडे सोपवण्यात आला आहे. सध्या, या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. पीडितेच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे, आरोपीविरुद्ध बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

हे वाचलं का?

    follow whatsapp