अनैतिक संबंधाचा संशय पण भयानक सस्पेन्स, शेवटच्या क्षणापर्यंत खिळवून ठेवणारा मल्याळम सिनेमा, IMDb वर 7.3 रेटिंग
Avihitham movie malayalam : विवाहबाह्य संबंधांचा आरोप करणाऱ्या या जोडप्याला पकडून सत्य बाहेर आणण्याची जबाबदारी हा गट स्वतःवर घेतो. यानंतर कथेत विनोद, गैरसमज, वाद आणि नाट्यमय घडामोडींची मालिका सुरू होते.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अनैतिक संबंधाचा संशय पण भयानक सस्पेन्स
शेवटच्या क्षणापर्यंत खिळवून ठेवणारा मल्याळम सिनेमा
IMDb वर 7.3 रेटिंग
Avihitham movie malayalam : भारतीय प्रेक्षकांमध्ये गेल्या काही वर्षांत मल्याळम चित्रपटांनी स्वतःचा एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केलाय. विषयनिवड, कथानकातील ताजेपणा आणि वास्तविक विषयांची मांडणी करण्याच्या धाडसी प्रयोगांमुळे मॉलीवुडचे चित्रपट देशभर गाजत आहेत. थ्रिलर, ड्रामा, रोमांस, पौराणिक कथा किंवा अॅक्शन–कॉमेडी… कोणताही प्रकार असो, मल्याळम निर्मात्यांनी आकर्षक स्टोरीमुळे प्रेक्षकांचे मनोरंजन अधिक रंगतदार केले आहे.
अशाच चर्चेत असलेल्या चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘अविहितम’. 10 ऑक्टोबरला थिएटरमध्ये प्रदर्शित झालेली ही हलकीफुलकी कॉमेडी पण तितकेच वास्तव दाखवणारी फिल्म आहे.. आता केवळ महिन्याभरातच ओटीटीवर दाखल झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे हा चित्रपट आता हिंदी भाषेत देखील उपलब्ध आहे. IMDb वर ‘अविहितम’ला 7.3 अशी चांगली रेटिंग मिळाली असून हा चित्रपट ब्लॅक कॉमेडी–ड्रामाच्या श्रेणीत मोडतो. दिग्दर्शन सेना हेगडे यांचे असून पटकथा अंबरीश कलथेरा यांनी लिहिली आहे. उन्नी राज, रेन्जी कंकोल, विनीत चकयार, धनेश कोलियत, राकेश उशर आणि वृंदा मेनन यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. हा सिनेमा हॉटस्टारवर उपलब्ध आहे.
कथानक काय सांगतं?
चित्रपटाची कथा कंजनगड गावातील एका साध्या, पण हलक्याफुलक्या प्रसंगाभोवती फिरते. प्रकाशन नावाचा एक व्यक्ती रोजप्रमाणे दारू पिऊन रात्री शेतातून घरी परतत असतो. चांदण्याच्या प्रकाशात शेती पिकांतून चालत असताना त्याला एक मुलगा आणि मुलगी एकमेकांना चुंबन घेताना दिसतात. बारकाईने पाहिल्यावर त्याला जाणवतं की मुलगा म्हणजे त्याचा शेजारी विनोद आहे. तो गावातील सुतार माधवन यांच्या शेतात एका मुलीसोबत प्रेमसंबंधात मग्न असतो.
ही गोष्ट पाहून प्रकाशन संतापतो आणि तो लगेचच गावातील शिंपी असलेल्या वेणुला संपूर्ण प्रसंग सांगतो. हळूहळू ही चर्चा गावभर पसरते. विनोद हा विवाहित असल्याने हा प्रकार थेट विवाहबाह्य संबंधांचा ठरतो आणि त्यामुळे गावकऱ्यांमध्ये गोंधळ उडतो.










