मुख्यमंत्री वगळता सर्वच मंत्र्यांचा राजीनामा, गुजरातमध्ये राजकीय खलबत?

मुंबई तक

Gujrat Government : गुजरातच्या सर्वच मंत्र्यांनी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याकडे राजीनामे सुपूर्द केले आहेत, यामागचं खरं कारण काय हे बघणं गरजेचं आहे.

ADVERTISEMENT

gujrat government
gujrat government
social share
google news

बातम्या हायलाइट

point

गुजरातमधील मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी राजीनामे दिले

point

नवीन मंत्रिमंडळाच्या स्थापनेची प्रक्रिया सुरु?

Gujrat Government : देशात महाराष्ट्रानंतर देशाचं राजकारण हे सद्यास्थितीत गुजरात राज्याभोवती फिरताना दिसतेय. कारण गुजरातमध्ये सध्या मुख्यमंत्री वगळता मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. सूत्रांनी दिलेल्या या प्रकरणाच्या माहितीनुसार, गुजरातच्या सर्वच मंत्र्यांनी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याकडे राजीनामे सुपूर्द केले आहेत. अशातच आता नवीन मंत्रिमंडळाच्या स्थापनेची प्रक्रिया सुरु झाली असल्याचं बोललं जातंय. 

हे ही वाचा : आधी ट्रान्सजेंडरवर बलात्कार आणि नंतर ब्लॅकमेलिंग, 24 ट्रान्सजेंडरने फिनाईल पिऊन... हादरवून टाकणारं प्रकरण

नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी कधी? 

नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी उद्या शुक्रवार 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 11:30 वाजता गांधीनगर येथील महात्मा मंदिर येथे नवीन मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे, अशातच आता यामागचं कारण समोर आलं आहे. 

भाजपचे प्रदेशाध्यक्षपदी जगदीश विश्वकर्मा

गुजरातचे भाजपचे प्रदेशाध्यक्षपदी जगदीश विश्वकर्मा यांची निवड करण्यात आली, याच कारणाने मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता आहे. भाजपच्या एका वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी कॅबिनेटमंत्री विस्तारात जवळपास 10 मंत्र्यांचा समावेश  होण्याची शक्यता असल्याचं म्हटलं. तर विद्यमान मंत्रिमंडळातील अर्ध्या मंत्र्‍यांना  वगळले जाण्याची शक्यता आहे. 

हे ही वाचा : 48 वर्षांपूर्वी मुंबईमध्ये महिलेवर चाकूने केला हल्ला, आरोपी कोकणात लपून बसला, पोलिसांनी 71 व्या वर्षी केलं अटक

मिळालेल्या एकूण माहितीनुसार, गुजरात मंत्रिमंडळात बदलांची देखरेख भाजप अध्यक्ष जेपी नड्डा करणार आहेत. ते आता गुरुवारी सायंकाळच्या सुमारास गुजरातमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बैठकांमध्ये गुजरात सरकारच्या मंत्रिमंडळातील होणाऱ्या फेरबदल आणि राज्यातील प्रमुख संघटनात्मक बाबींवर केंद्रस्थानी राहण्याची शक्यता वर्तवली जाईल अशी अपेक्षा असेल. 

हे वाचलं का?

    follow whatsapp