Raj Thackeray: 'आज अजित पवारांनीही यायला हवं होतं', शेवटची ओळ अन् राज ठाकरेंनी दादांना का डिवचलं?
निवडणूक आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामधून त्यांनी अजित पवार यांना डिवचलं आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये मतदार याद्यांचा घोटाळा, मतदान पद्धती या सगळ्याबाबत राज्यातील विरोधी पक्षांनी निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्या तक्रारी निवडणूक आयोगासमोर मांडल्या. याच सगळ्याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थोड्या वेळापूर्वीच एका फेसबुक पोस्ट शेअर करून निवडणूक आयोगाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे. पण याचवेळी पोस्टच्या शेवटच्या ओळीतून त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना डिवचलं आहे.
राज ठाकरेंनी शेवटच्या ओळीतून कसा काढला अजितदादांना चिमटा?
'निवडणूक यादीत घोळ आहेत, ते घोळ आम्ही राज्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडे ठेवलेले आहेत. त्यावर निवडणूक आयोगाने कार्यवाही करून घोळ सोडवावेत इतकीच आमची इच्छा आहे. या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या २३२ जागा निवडून आल्या तरीही महाराष्ट्रात शांतता होती. कोणीही जल्लोष केला नाही हे कसलं द्योतक आहे? २०१९ साली याच विषयावर मी पत्रकार परिषद घेतली होती, त्यावेळीही राज्यातील सर्व विरोधी पक्षांचे नेते पत्रकार परिषदेत सहभागी होते. त्यावेळी अजित पवारही तिथे उपस्थित होते. त्यांनीही आज यायला हवं होतं.'
हे ही वाचा>> निवडणूक आयोगाची वेबसाईट कोणीतरी बाहेरचा माणूस हाताळतो, जयंत पाटलांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोगाच्या बैठकीनंतर राज ठाकरेंची फेसबुक पोस्ट जशीच्या तशी...
मागच्या वर्षी झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या सार्वत्रिक निवडणुकांपासूनच, राज्य निवडणूक आयोगाच्या पारदर्शीतेबद्दल लोकांच्या आणि राजकीय व्यवस्थेच्या मनावर शंकेचं सावट आहे.
येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका यातरी किमान पारदर्शी व्हाव्यात आणि निवडणूक आयोग खरंच स्वायत्त आहे हे दिसलंच पाहिजे. पण आत्ता निवडणूक आयोगाच्या कारभारात काही त्रुटी आहेत…