Jalna Crime : जालना जिल्ह्यतील मामा आणि भाच्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. सख्ख्या मामानेच आपल्या भाच्याची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदान ते जालना या मुख्य रस्त्यावरील असलेल्या डावरगाव फाट्यावर पहाटे 11 वाजेच्या सुमारास हे प्रकरण उघडकीस आले. संबंधित प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास करत मृतदेहाची पाहणी केली. दरम्यान, मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव परमेश्वर लोखंडे (वय 21) असे आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : दिवाळी सणाला मोठा अनर्थ, छठपूजेला जाताना एक्सप्रेसमधून पडून दोघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी
मामाने भाच्याच्या डोक्यावर आणि पोटात रॉडने केला हल्ला
या घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तपास सुरु केला. पोलिसांनी केलेल्या या एकूण तपासात मयताच्या डोक्यावर आणि पोटावर लोखंडी रॉडने हल्ला केला होता. पोलिसांनी चक्र फिरवत मयत परमेश्वर लोखंडे यांच्या मृतदेहाजवळ एक क्रुझर गाडी मिळाल्यानंतर पोलिसांनी पुढील अधिकचा तपास केल्यानंतर मामानेच आपल्या भाच्याचा खून केल्याचं समोर आलं.
अखेर मामाने दिला कबुलीनामा
संबंधित प्रकरणात आरोपी मामा आणि त्याच्याच एका साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर भाच्याच्या हत्येचं कारण समोर आले. जमिनीच्या वादातून मामाने भाच्याला लोखंडी रॉडने मारहाण केल्याचा कबुलीनामा दिला होता. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, ऐन सणासुदीच्या काळात घडलेल्या या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.
हे ही वाचा : वहिनीनेच दिराला मैत्रिणीसोबत खोलीत पाठवले, नंतर कॅमेरे लावून सर्वच रेकॉर्ड करत 10 लाखांची मागणी अन् हनीट्रॅप...
एकूण प्राथमिक माहितीनुसार, मृत तरुण परमेश्वार लोखंडे याच्या डोक्यात आणि पोटात, हाता-पायांवर लोखंडी रॉडने बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याचा मृतदेह हा जालना भोकरदन या मुख्य मार्गावरील डावरगाव फाट्यावर आणून टाकण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरून काही वस्तू ताब्यात घेतल्या आहेत.
ADVERTISEMENT
