वहिनीनेच दिराला मैत्रिणीसोबत खोलीत पाठवले, नंतर कॅमेरे लावून सर्वच रेकॉर्ड करत 10 लाखांची मागणी अन् हनीट्रॅप...
Crime News : वहिनीनेच दिराला मैत्रिणीसोबत खोलीत पाठवले होते. त्यानं नंतर खोलीत कॅमेरे लावून सर्वच रेकॉर्ड करत दीरालाच ब्लॅकमेल करून 10 लाखांची मागणी करत हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

वहिनीने आपल्या दीरालाच हनी ट्रॅपमध्ये अडकवल्याचा धक्कादायक प्रकार

नेमकं काय घडलं?
Crime News : वहिनीने आपल्या दीरालाच हनी ट्रॅपमध्ये अडकवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यानंतर त्याला मारहाणही करण्यात आली होती. या प्रकरणाची तक्रार पीडित दीराने पोलीस ठाण्यात दाखल केली. संबंधित प्रकरणात पोलिसांनीही कारवाई करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. अशातच आता संपूर्ण पोलिसांचं पथक हनी ट्रॅपमध्ये सक्रीय असणाऱ्यांचा शोध घेत आहेत.
हे ही वाचा : फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याने ओळखीचा गैरफायदा घेतला, नंतर मुलीच्या घरी येणं जाणं सुरु केलं अन्... रत्नागिरी हादरलं!
एकूण प्रकरण काय?
मुरैना येथील पिपर सेवा परिसरातील रहिवासी रविंद्रला त्याच्याच ओमवती नावाच्या वहिनीने ग्वालियर येथे बोलावण्यात आले होते. ओमवतीने रविंद्रसोबत फोनवर सांगितलं की, ती आपली मैत्रीण रुक्मिणीशी भेट घालून देणार होती आणि त्यांच्यात मित्र प्रेमाचं नातं होतं आणि त्यांच्यात मैत्री पूर्ण संबंध प्रस्थापित करून द्यायचे होते. त्यानंतर रविंद्र बुधवारी ग्वालियर येथे पोहोचले.
दीरासह मैत्रिणीला खोलीत पाठवले नंतर...
रविंद्र ग्वालियर येथे पोहोचल्यानंतर ओमवतीने आपली मैत्रीण रुक्मीणीला बोलावले. तेव्हा रविंद्रला गोवर्धन कॉलनीतील असलेल्या एका घरात पाठवले. तेव्हा रुक्मीणी आणि रविंद्र त्याच ठिकाणी होते, तोवर परिस्थिती अगदीच सामान्य होते. मात्र, क्षणार्धात परिस्थिती बदलली आणि दोघेही एकाच ठिकाणी होते. त्यानंतर अचानकपणे रविंद्रची वहिणी ओमवती तिच्या तीन साथीदारांसह अंकित, कौशल आणि आदित्यसह अचानकपणे खोली आली. त्याआधी, त्यांनी खोलीत गुप्त कॅमेरे बसवले होते. त्यानंतर दोघांचाही व्हिडिओ रेकॉर्ड केला होता.
रविंद्रला 10 लाखांची मागणी
संबंधित व्हिडिओ बनवल्यानंतर ओमवतीने रविंद्रला 10 लाखांची मागणी केली. जर त्याने पैसे दिले नाही,तर तो व्हिडिओ व्हायरल करेल असं म्हणत धमकी देत ब्लॅकमेल केलं. तेव्हाच रविंद्रने नकार दिल्यानंतर आरोपीने हल्ला केला आणि त्याच्याकडून 8 हजार रोख रक्कम हिसकावून घेतली. घटनास्थळावरून पीडित तरुणाने कशीबशी आपली सुटका करून घेतली आणि थेट गोलाच्या मंदिर पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार नोंद केली. त्यानंतर घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगसह महत्त्वाचे पुरावे गोळा गेले. दरम्यान, पोलिसांनी आरोपीविरोधात ब्लॅकमेलिंग, मारहाण आणि दरोडा टाकल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.