फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याने ओळखीचा गैरफायदा घेतला, नंतर मुलीच्या घरी येणं जाणं सुरु केलं अन्... रत्नागिरी हादरलं!
Ratnagiri Crime : रत्नागिरी जिल्ह्यतील चिपळूण शहरात माणुसकीला काळिमा लावणारं धक्कादायक प्रकरण आता समोर आलं आहे. एका मायक्रो फायनान्स कंपनीच्या एका कर्मचाऱ्याने कर्ज वसुलीच्या निमित्ताने झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत अल्पवयीन मुलीवर लैंगिक शोषण केले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

चिपळूण शहरात माणुसकीला काळिमा लावणारं धक्कादायक प्रकरण

बँक कर्मचाऱ्याने केले अल्पवयीन मुलीवर केले लैंगिक शोषण
Ratnagiri Crime : रत्नागिरी जिल्ह्यतील चिपळूण शहरात माणुसकीला काळिमा लावणारं धक्कादायक प्रकरण आता समोर आलं आहे. एका मायक्रो फायनान्स कंपनीच्या एका कर्मचाऱ्याने कर्ज वसुलीच्या निमित्ताने झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत अल्पवयीन मुलीवर लैंगिक शोषण केले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला क्षणार्धातच अटक केली असून खेड न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आरोपीचं नाव आदित्य समीर बने (वय 25) असे आहे.
हे ही वाचा : नंदुरबारमध्ये भीषण अपघात, देवीच्या यात्रेवरून येणारी पिकअप उलटली, 10 हून अधिक गंभीरपणे जखमी, मृतांची संख्या...
अल्पवयीन मुलीच्या घरी जाऊन बँक कर्मचाऱ्याने...
आदित्य हा शहरातील एका मायक्रो फायनान्स या कंपनीत कर्ज वसुलीचे काम करायचा. याच कंपनीतून पीडितेच्या आईने कर्ज देखील घेतले होते.या कर्जामुळे कंपनीच्या कामानिमित्त तो पीडित अल्पवयीन मुलीच्या घरी जाऊ लागला होता. यानंतर त्याने मुलीचं वारंवार लैंगिक शोषण केले. त्यानंतर आता आरोपी आदित्य बने या आरोपीवर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
व्हॅन चालकाचा विद्यार्थिनीवर विनयभंग
दरम्यान, यापूर्वी चिपळूणमध्ये एका विद्यार्थ्याने शाळा आणि कॉलेजमध्ये ने-आण करणाऱ्या व्हॅनचा चालक वहाब वावेकरने याने एका विद्यार्थिनीचा विनयभंग विनयभंग केल्याची माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना आहे. या प्रकरणात आरोपी वहाब वावेकर विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली.
हे ही वाचा : विकृतीचं टोक! पुण्यात तरुणाने श्वानावर केले लैंगिक अत्याचार, धक्कादायक प्रकरण कॅमेऱ्यात कैद, प्राणी मित्रांचा संताप
एका पाठोपाठ घडलेल्या दोन गंभीर गुन्ह्यांमुळे संपूर्ण चिपळूण शहरात संतापाची लाट पसरली आहे. या घटनेनं पालकांसह मुलांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. या घटनेनं कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसतेय. विद्यार्थ्यांना शाळा ते घर - घर ते शाळा सुखरुप पोहोचवण्यासाठी व्हॅनची सोयीसुविधा असते. पण, याच व्हॅन चालकाने केलेल्या कृत्यामुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय.