नंदुरबारमध्ये भीषण अपघात, देवीच्या यात्रेवरून येणारी पिकअप उलटली, 10 हून अधिक गंभीरपणे जखमी, मृतांची संख्या...

मुंबई तक

Nandurbar Accident News : नंदुरबार जिल्ह्यात 18 ऑक्टोबर रोजी शनिवारी एक मोठा अपघात झाला. अष्टांबी देवीच्या यात्रेवरून परतणाऱ्या पिकअपमध्ये अनेक यात्रेकरू होते. या भीषण अपघातात तब्बल 6 यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे

ADVERTISEMENT

Nandurbar Accident News
Nandurbar Accident News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नंदुरबार जिल्ह्यात 18 ऑक्टोबर रोजी अपघात

point

भीषण अपघातात तब्बल 6 यात्रेकरूंचा मृत्यू

Nandurbar Accident News : नंदुरबार जिल्ह्यात 18 ऑक्टोबर रोजी शनिवारी एक मोठा अपघात झाला. अष्टांबी देवीच्या यात्रेवरून परतणाऱ्या पिकअपमध्ये अनेक यात्रेकरू होते. त्याच पिकअप व्हॅनचा अपघात झाला. या भीषण अपघातात तब्बल 6 यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे, तर 10 हून अधिक जण गंभीरपणे जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

हे ही वाचा : दिवाळी सणापूर्वी झाला बुध ग्रहाचा उदय, 'या' राशीतील लोकांचे उजळणार दिव्यांसारखे नशीब

चालकाचे नियंत्रण सुटले आणि पिकअप रस्त्याच्या कडेला...

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास पिकअप घाटातील एका वळणावर पोहोचली आणि चालकाचे नियंत्रण सुटले आणि पिकअप रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात कोसळली आणि त्यात अनेक लोक अडकून पडले. 

जखमींचे बचावकार्य सुरु 

संबंधित अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, बचावकार्य सुरु असून जखमींना तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमींना पुढील उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले जाण्याची शक्यता आहे. 

हे ही वाचा : Dhantrayodashi 2025: धनत्रयोदशीच्या दिवशी कोणत्या वस्तूंची खरेदी करावी? 'या' मुहूर्तावर करा खरेदी...

अष्टंबा देवी यात्रा ही आदिवासी समुदायाचं एक दैवत आहे. एक धार्मिक प्रथा म्हणून याकडे पाहिले जाते, मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहतात. तीर्थयात्रेवरून परतात असताना या झालेल्या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. या घटनेनं परिसरात शोककळा पसरली होती. 

हे वाचलं का?

    follow whatsapp