Dhantrayodashi 2025: धनत्रयोदशीच्या दिवशी कोणत्या वस्तूंची खरेदी करावी? 'या' मुहूर्तावर करा खरेदी...
लोक धनत्रयोदशीच्या दिवशी सोने, चांदी आणि वाहने देखील खरेदी करतात. आज खरेदी आणि पूजेसाठी शुभ मुहूर्तांविषयी सविस्तर जाणून घेऊया.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

धनत्रयोदशीच्या दिवशी कोणत्या वस्तूंची खरेदी करावी?

आज 'या' मुहूर्तावर करा खरेदी...
Dhantrayodashi 2025: दिवाळीच्या सणात धनत्रयोदशीला विशेष महत्त्व आहे. आज म्हणजेच 18 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी साजरी केली जात आहे. दरवर्षी, आश्विन कृष्ण त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशी साजरी केली जाते. या दिवशी संध्याकाळी धनाची आणि धन्वंतरीची पूजा करण्यात येते. तसेच, यादिवशी कुबेर आणि माता लक्ष्मीची देखील पूजा केली जाते. खरंतर, या दिवशी ज्या वस्तूंची खरेदी केली जाते, ते वर्षभर व्यक्तीला फायदेशीर ठरत असल्याचं म्हटलं जातं. म्हणूनच लोक या दिवशी सोने, चांदी आणि वाहने देखील खरेदी करतात. आज धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी आणि पूजेसाठी शुभ मुहूर्तांविषयी सविस्तर जाणून घेऊया.
धनत्रयोदशी 2025 मुहूर्त
पंचांगानुसार, कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी 18 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:18 वाजता सुरू होईल आणि तिथी 19 ऑक्टोबर रोजी दुपारी 1:51 वाजता संपेल.
खरेदी करण्याचा मुहूर्त
धनत्रयोदशीचा पहिला शुभ मुहूर्त आज सकाळी 8:50 ते 10:33 पर्यंत आहे. त्यानंतर, दुसरा शुभ मुहूर्त सकाळी 11 वाजून 43 मिनिटे ते दुपारी 12 वाजून 28 मिनिटांपर्यंत असेल. तसेच, संध्याकाळी 7 वाजून 16 मिनिटे ते रात्री 8 वाजून 20 मिनिटांपर्यंत या दिवसाचा तिसरा मुहूर्त आहे.
1. लाभ आणि उन्नती मुहूर्त: दुपारी 01:51 ते 03:18 पर्यंत
2. अभिजीत मुहूर्त: दुपारी 12:01 ते 12:48 .
3. अमृत काळ: दुपारी 2.57 ते दुपारी 4.23
4. शुभ खरेदी काळ: दुपारी 12.18 ते दुसऱ्या दिवशी, 19 ऑक्टोबर रोजी सकाळी 06.26 पर्यंत