ऐन दिवाळीत मोठी दुर्घटना, छठपूजेला जाताना एक्सप्रेसमधून पडून दोघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

मुंबई तक

Nashik Road Railway Accident : मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनसहून बिहारकडे जाणाऱ्या कर्मभूमि एक्सप्रेसमधून नाशिक रोड रेल्वे स्थानकाजवळ तीन प्रवासी पडले. या तीन प्रवाशांपैकी दोघांचा मृ्त्यू झाला आणि एकजण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

ADVERTISEMENT

Nashik Road Railway Accident
Nashik Road Railway Accident
social share
google news

बातम्या हायलाइट

point

कर्मभूमि एक्सप्रेसमधून नाशिक रोड रेल्वे स्थानकाजवळ तीन प्रवासी पडले

point

तीन प्रवाशांपैकी दोघांचा मृ्त्यू

Nashik Road Railway Accident : मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनसहून बिहारकडे जाणाऱ्या कर्मभूमि एक्सप्रेसमधून नाशिक रोड रेल्वे स्थानकाजवळ तीन प्रवासी पडले. या तीन प्रवाशांपैकी दोघांचा मृ्त्यू झाला आणि एकजण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. प्रवासी छठपूजेसाठी मुंबईहून बिहारकडे निघाले होते. त्याचदरम्यान हा भीषण अपघात झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, या भीषण अपघात 18 ऑक्टोबर रोजी शनिवारी झाला. एका तरुणावर जिल्हा रुग्णालयात प्रचार सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. 

हे ही वाचा : दिवाळी सणाआधी 'या' राशीतील लोकांना धोका निर्माण होईल, काय सांगतं राशीभविष्य?

नेमकं काय घडलं? 

शनिवारी रात्री कर्मभूमि एक्सप्रेस नाशिक रोड स्थानकावर न थांबता पुढे गेली, नंतर ओढा  स्थानकाचे संबंधित प्रबंधक आकाश यांनी रेल्वे विभागाशी संपर्क साधला. या एकूण प्रकरणात त्यांनी माहिती दिली की, रेल्वे गाडी सुटल्यानंतर पुढे काही वेळानंतर जेल रोडवरील असणाऱ्या हनुमान मंदिराजवळ असलेल्या ढिकळेनगर परिसरात तीन तरुण रेल्वेतून पडल्याची माहिती मिळाली. 

दोघांचा मृत्यू आणि एकजण गंभीर जखमी

या एकूण घटनेची माहिती मिळताच नाशिक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाने पोलीस उपनिरीक्षक माळी, तसेच इतर पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या प्रकरणाचा तपास केला असता, भुसावळकडे जात असणाऱ्या पटरीवरील 190/1 ते 190/3 दरम्यान, 30 ते 35 वयोगटातील दोन तरुण मृतावस्थेत आढळले, तर एक तरुण हा गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

हे ही वाचा : फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याने ओळखीचा गैरफायदा घेतला, नंतर मुलीच्या घरी येणं जाणं सुरु केलं अन्... रत्नागिरी हादरलं!

जखमी झालेल्या तरुणाला रुग्णवाहिकेतून जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, मृत आणि जखमींची अद्यापही ओळख पटली नसल्याचं सांगण्यात येत आहे. दिवाळी सणानिमित्त बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात छठपूजा साजरी केली जाते. याच छठपूजेसाठी जाणाऱ्या गाड्यांमध्ये मोठी गर्दी असल्याने त्या तरुणांचा अपघात झाल्याचं समजतंय. याबाबत अधिकचा तपास सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे. 
 

हे वाचलं का?

    follow whatsapp