Mumbai News: मुंबईच्या लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकल ट्रेनचा प्रवास आता अधिक जलद आणि सोपा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. पश्चिम रेल्वेने गेल्या दोन वर्षात 15 ठिकाणांहून स्पीट-लिमिट बंद केली आहे. यामुळे आता लोकल ट्रेन जलद गतीने धावतील आणि प्रवाशांना कोणत्याही ठिकाणाहून प्रवास करण्यासाठी कमी वेळ लागणार असल्याचं सांगितलं जात आहे. पुलांचे बांधकाम, दुरुस्ती आणि इतर आवश्यक कामांमुळे हा बदल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
मुंबईतील लोकल ट्रेनच्या विकासासाठी पश्चिम रेल्वे सतत काम करत असल्याचं सांगितलं जातं. या कामांदरम्यान, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी गाड्यांचा वेग कमी करावा लागतो. पण, आता बऱ्याच ठिकाणी काम पूर्ण झालं असून त्या ठिकाणांहून स्पीड-लिमिट काढून टाकण्यात आल्याचं वृत्त समोर आलं आहे.
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली माहिती...
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रॅन्ट रोड ते मुंबई सेंट्रल दरम्यान पूल क्रमांक 5 आणि पूल क्रमांक 20 तसेच कांदिवली जवळील पूल क्रमांक 61 पुन्हा बांधण्यात आला आहे. जुने ब्रिटिशकालीन स्क्रू ब्रिज काढून टाकण्यात आले असून त्याऐवजी नवीन आरसीसी (RCC) पूल बसवण्यात आले आहेत. ऑक्टोबर 2024 पासून गोरेगाव आणि कांदिवली दरम्यान 6 वी लाइन बनवण्यासाठी स्पीट लिमिट लावण्यात आली होती. काम पूर्ण झाल्यानंतर ही स्पीट लिमिट काढून टाकण्यात आली. तसेच, वांद्रे टर्मिनसला जाणाऱ्या मेल-एक्सप्रेस गाड्या पाचव्या आणि सहाव्या मार्गावर चालवल्या गेल्या.
हे ही वाचा: Govt Job: सैन्यात नोकरीची सुवर्णसंधी... 'या' पदांसाठी करा अप्लाय! आजपासून अर्ज करण्यासाठी सुरूवात..
यामुळे मेल-एक्सप्रेस आणि लोकल गाड्यांच्या वेळेवर चालवण्याच्या दृष्टीने चांगला बदल पाहायला मिळतोय. आता पश्चिम रेल्वेवरील 95 टक्के गाड्या वेळेवर धावत आहेत. गेल्या दोन वर्षांत पश्चिम रेल्वेने बऱ्याच ठिकाणी स्पीड लिमिट काढून टाकली आहे. यामुळे लोकल गाड्यांचा वेग वाढला आहे.
एप्रिल 2023 ते मार्च 2024 पर्यंत 'या' ठिकाणी स्पीड लिमिट बंद
खार- सांताक्रूझ: 60 किमी प्रतितास
सांताक्रूझ- विलेपार्ले: 75 किमी प्रतितास
सांताक्रूझ- खार: 75 किमी प्रतितास आणि 60 किमी प्रतितास
हे ही वाचा: मुलीने दिला लग्नाला नकार! वडिलांनी रागाच्या भरात उशीने तोंड दाबून केली हत्या; नंतर स्वत:सुद्धा... हिंगोलीतील धक्कादायक घटना
एप्रिल 2024 ते मार्च 2025 पर्यंत 'या' ठिकाणी स्पीड लिमिट बंद
माटुंगा रोड- माहिम (पाचवी लाइन): 15 किमी, 50 किमी आणि 15 किमी प्रतितास
माहिम- वांद्रे (पाचवी लाइन): 30 किमी आणि 10 किमी प्रतितास
वांद्रे टर्मिनस ते सांताक्रूझ: 45 किमी आणि 45 किमी प्रतितास
अंधेरी यार्ड परिसर: 50 किमी प्रतितास
सांताक्रूझ ते वांद्रे: 75 किमी प्रतितास
वांद्रे ते माहिम: 15 किमी प्रतितास
जोगेश्वरी ते गोरेगाव: 55 किमी प्रतितास
ADVERTISEMENT
