Mumbai MHADA Lottery: सर्वसामान्य मुंबईकरांचं घर घेण्याचं स्वप्न साकार करण्यात महाराष्ट्र गृहनिर्माण नियामक विकास प्राधिकरण (म्हाडा) ने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मुंबईसारख्या मोठ्या शहरात MHADA मुळे आज मोठ्या संख्येने लोक स्वतःच्या घरात राहत आहेत. 'म्हाडा'कडून आता मुंबईत केवळ घरेच नाही तर परवडणारी दुकाने आणि व्यावसायिक संकुल देखील उपलब्ध होणार असल्याची बातमी समोर आली आहे.
ADVERTISEMENT
'म्हाडा'कडून सुवर्णसंधी
बरेच लोक अजूनही मोठ्या आशेने म्हाडाचे फॉर्म भरतात आणि लॉटरीची वाट पाहतात. म्हाडाच्या माध्यमातून सामान्य नागरिक त्यांच्या बजेटमध्ये परवडणारी घरं खरेदी करू शकतात. कारण ही घरे बाजारभावापेक्षा 20 ते 30 लाख रुपये कमी किमतीत उपलब्ध होतात. हजारो लोकांच्या घराचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या म्हाडाने आता आणखी एक सुवर्णसंधी सर्वसामान्यांना उपलब्ध करुन दिली आहे. म्हाडा आता मुंबईत केवळ घरेच नाही तर परवडणारी दुकाने आणि व्यावसायिक संकुल देखील उपलब्ध करून देईल.
हे ही वाचा: 'इतकी' सुंदर दिसते अर्जुन तेंडुलकरची होणारी पत्नी! 'या' लेटेस्ट फोटोंमध्ये पाहा झलक
मुंबईच्या 17 ठिकाणी 149 दुकाने
म्हाडाकडून एकूण 149 दुकानांचा ई-लिलाव केला जाणार असल्याची माहिती आहे. या ई-लिलावात मुंबईतील 17 ठिकाणी असलेल्या 149 दुकानांचा समावेश आहे. यामध्ये गेल्या लिलावात विकता न आलेल्या 124 दुकानांचाही समावेश आहे. यासाठी 23 लाख ते 12 कोटी रुपयांच्या दरम्यान बोली लावण्यात आली आहे.
हे ही वाचा: अर्जुन तेंडुलकरने बालपणीच्या मैत्रिणीसोबतच उरकला साखरपुडा... सानिया चंडोक नेमकी आहे तरी कोण?
किती दुकानासाठी किती ठेव?
म्हाडाने या ई-लिलावापूर्वी जमा करण्याच्या रकमेची माहिती दिली आहे. 50 लाख रुपयांपर्यंतच्या दुकानांसाठी 1 लाख रुपये ठेव रक्कम असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसेच, 50 लाख ते 75 लाख रुपयांपर्यंतच्या दुकानांसाठी 2 लाख रुपये ठेव रक्कम ठेवण्यात आली आहे. 75 लाख ते 1 कोटी रुपयांच्या दुकानांसाठी 3 लाख रुपये ठेव रक्कम असून 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या दुकानांसाठी 4 लाख रुपये ठेव रक्कम आहे. या लिलावात जो अर्जदार सर्वाधिक रक्कम बोली लावेल तोच विजेता ठरेल. म्हणूनच, मुंबईत दुकाने खरेदी करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी ही एक सुवर्णसंधी मानली जात आहे.
ADVERTISEMENT
