कोकणात भागात मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी वातावरण स्थिर, पाहा 'या' भागांत पावसाचा ऑरेंज आणि येलो अलर्ट

maharashtra weather : राज्यातील कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच एकूण राज्यातील पावसाची परिस्थिती पुढीलप्रमाणे नमूद केली आहे.

maharashtra weather (grok)

maharashtra weather

मुंबई तक

• 06:11 AM • 14 Aug 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

भारतीय हवामान खात्याचा अंदाज

point

14 ऑगस्ट 2025 रोजी हवामान कसे असेल?

point

'या' जिल्ह्यांना पावसाचा यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी

हे वाचलं का?

maharashtra weather : भारतीय हवामान खात्याने (IMD) 14 ऑगस्ट 2025 रोजी राज्यात मुसळधार पावसाची शक्यतेचा अंदाज जारी केला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे काही भागात पावसाच्या प्रमाणात वाढ झाली. मुख्यत्वे राज्यातील कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.

हे ही वाचा : pune crime : तरुण काकीला 'I Love You' म्हणाला, भावाची सटकली, नंतर भररस्त्यात हॉकी स्टिकने केली अमानुष मारहाण

कोकण :

कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच मुंबई उपनगरांमध्ये ढगांच्या गडगडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान हा 31 अंश सेल्सिअस आहे. तर किमान तापमान हा 25 अंश सेल्सिअस आहे. रागयगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर येथे पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मध्य महाराष्ट्र :

मध्य महाराष्ट्र भागातील पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूरात मध्यम ते मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. पुण्यात हलक्या पावसासह ढगाळ वातावरण राहील, तर पश्चिम घाटाच्या भागात भूस्खलनाचा धोका वाढेल, असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा घाटमाथ्यावर हवामान विभागाने पावसाचा येलो जारी केलाय.

विदर्भ :

विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा येथे पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. तर याच भागांत 64.5-115.5 मिमी पावसाचा अंदाज आहे. 50 किमी प्रतितास वेगाने वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. यवतमाळ, चंद्रपूर आणि अमरावतीत पावसाचा ऑरेंज तर गडचिरोलीत पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हे ही वाचा : लेकीच्या संसारात सासू करायची लुडबुड, अखेर जावयाची सटकली, मटण तोडल्यासारखे केले 19 तुकडे, पोलिसांचीही टरकली

मराठवाडा :

मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड आणि परभणी येथे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तुरळक ठिकाणी मध्यम पाऊस आणि काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

    follow whatsapp