आरारारारा! पोरांनी स्मार्ट स्क्रीनवर पाहिला अश्लील चित्रपट..एकाने Video थेट मुख्याध्यापकांना दाखवला अन्..सरकारी शाळेत उडाली खळबळ!

School Students Shocking Viral News :  मध्यप्रदेशच्या राजगढ येथे असलेल्या सुठालिया येथे एका शासकीय माध्यमिक विद्यालयात खळबळजनक घटना घडली.

School Shocking Video Viral

School Shocking Video Viral

मुंबई तक

• 05:15 PM • 13 Aug 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

शाळेतील विद्यार्थ्यांनी स्मार्ट स्क्रिनवर पाहिला अश्लील व्हिडीओ

point

व्हिडीओ व्हायरल झाल्यावर शिक्षण अधिकाऱ्यांनी दिले चौकशीचे आदेश

point

त्या शाळेत घडलं तरी काय? सर्वांनाच बसलाय धक्का

School Students Shocking Viral News :  मध्यप्रदेशच्या राजगढ येथे असलेल्या सुठालिया येथे एका शासकीय माध्यमिक विद्यालयात खळबळजनक घटना घडली. या शाळेतील स्मार्ट क्लासमध्ये विद्यार्थी अश्लील व्हिडीओ पाहत होते. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. शाळेतील मुख्याध्यापकाने यावर स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी म्हटलं, हा व्हिडीओ लेटेस्ट नाही. हा व्हिडीओ 8-10 महिन्यांपूर्वीचा आहे. 

हे वाचलं का?

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी तीन प्राचार्यांची टीम गठित करण्याचे आदेश दिले. शाळेतील प्राध्यापकांनी म्हटलं, काल एका स्थानिक व्यक्तीने मला हा व्हिडीओ दाखवला आणि 50   हजार रुपयांची मागणी केली होती. जेव्हा मी त्याला पैसे देण्यास नकार दिला, तेव्हा त्याने व्हिडीओ व्हायरल केला. या घटनेमागचं सत्य काय आहे, हे तपासानंतरच समोर येईल. याप्रकरणी दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणी स्थानिक लोकांनी केली आहे. 

हे ही वाचा >> NASA च्या इंटर्नने चंद्राचा तुकडा चोरला..बेडखाली ठेऊन गर्लफ्रेंडसोबत रोमान्स केलं अन् नंतर सगळंच व्हायरल झालं!

व्हिडीओ व्हायरल झाल्यावर शिक्षण अधिकाऱ्यांनी दिले चौकशीचे आदेश

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हा शिक्षण अधिकारी करण सिंह भिलाला यांनी याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर, जीरापूर उत्कृष्ट शाळेचे आणि तलेन शाळेचे प्राध्यापकांनी तीन सदस्यांची समिती गठित केली. शालेय प्रशासनाने स्पष्टीकरण दिलं आहे की, हा लेटेस्ट व्हिडीओ नाहीय.

हा व्हिडीओ 8-10 महिन्यांपूर्वीचा आहे. प्राध्यापक हेमंत यादव यांनी म्हटलं, हा व्हिडीओ केव्हा आणि कसा व्हायरल झाला, याबाबत मला माहित नाही. या घटनेनंतर शिक्षण विभागाने सर्व शाळांना डिजिटल उपकरणांवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आता प्रत्येक इयत्तेच सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यासाठी आणि स्मार्ट स्क्रिनला पासवर्ड आणि वायफाय इंटरनेटवर नियंत्रण ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

हे ही वाचा >> कोकणात मान्सूनची स्थिती स्थिर, काही भागांमध्ये पावसाचा येलो अलर्ट, आजचं हवामान कसं असेल?

दरम्यान, अकरावी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची चौकशी केली जात आहे. याप्रकरणी काही मुलांची नावंही समोर आली आहेत. आता त्या मुलांच्या पालकांशी चर्चा केली जाणार असल्याचं बोललं जात आहे. विद्यार्थ्यांचं समुपदेशनही करण्यात येणार आहे. याप्रकरणी जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. 

    follow whatsapp