ADVERTISEMENT
Maharashtra Weather : भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) ने 13 ऑगस्ट रोजी राज्यातील विविध भागांमध्ये मध्यम ते मुसळधार स्वरुपाच्या पावसाचा अंदाज जारी केला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने काही भागात पावसाची शक्यता आहे. विशेषकरून कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर वाढेल अशी हवामान विभागाने शक्यता वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातही काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे, परंतु काही भागात उष्ण आणि दमट वातावरण कायम राहील. हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचा आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे.
हे ही वाचा : तरुणीला पाहताच तरुणाला कंट्रोलच झालं नाही, त्यानं पँटची चैन काढली अन् भररस्त्यातच हस्तमैथुन...व्हिडिओ तुफान व्हायरल
कोकण :
कोकणात पावसाळा सुरू झाल्यानंतर काही दिवस मान्सूनची स्थिती चांगली होती. जुलै महिन्यात कोकणात मान्सूनची परिस्थिती चांगली होती. पण आता कोकणात पावसाचा लपंडाव पाहायला मिळतो. हवामान विभागाने मान्सूनबाबत मोठी शक्यता वर्तवली आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस, काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता असेल, अशा ठिकाणी हवामान विभागाने पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला.
विदर्भ :
विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया येथे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आणि विजांचा कडकडाट पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असून पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मराठवाडा :
मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी आणि बीड जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. या ठिकाणी हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.
मध्य महाराष्ट्र :
हे ही वाचा : श्रावणी सोमवारच्या दिवशी काळाचा घाला, जीप सहा वेळा पलटी अन् मृतांच्या संख्येत वाढ, हादरवून टाकणारी घटना
मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूरात ढगाळ वातावरण असणार आहे. तसेच हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. तर सोलापूरमध्ये काही अंशी भागात पावसाच्या सरी कोसळणार आहे. तसेच उष्ण आणि दमट वातावरणाची शक्यता आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव आणि धुळे अशा भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाच्या ढगाळ वातावरणाची परिस्थिती आहे.
ADVERTISEMENT
