Viral Video : माणुसकीला काळिमा फासणाऱ्या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नवऱ्याच्या डोळ्यादेखत बायकोचा अपघात झाला. या अपघातानंतर नवऱ्याने अनेकांना बायकोचा मृतदेह रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत मागितली. पण, कोणीही त्याला मदतीचा हात दिला नाही. ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना नागपूर-जबलपूर राज्य महामार्गावर घडली. दरम्यान, मृत महिलेचे नाव ग्यारसी अमित यादव असे आहे. तर नवऱ्याचे नाव अमित यादव असे आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : बीड हादरलं! तृतीयपंथीयाने पीडितेला कामाचे आमिष दाखवले अन् नेलं खोलीत, नंतर साथीदारांच्या मदतीने आळीपाळीने...
दुचाकीला कट मारला असता महिलेचा अपघात
देवलापारा पोलीस ठाणेअंतर्गत मोरफाटा परिसरात दुपारी साडे तीन वाजता ही घटना घडली आहे. एका वेगाने येणाऱ्या अवजड वाहनाने अमित यादवच्या दुचाकीला कट मारला असता, त्यात ग्यारसी यादवचा अपघात झाला. त्याच अपघातात निष्पाप पत्नीचा जागीच मृत्यू झाला. तेव्हा कोणीही माणुसकीच्या नात्याने अमित यादवला मदत केली नाही.
पतीने बायकोचा मृतदेह मोटारसायकलीला बांधला
अंतिम क्षणी अमित यादवने वाहनांना थांबवण्याची विनंती केली, पण कोणीही थांबले नाही. त्यानंतर अमितने आपल्या बायकोचा मृतदेह गाडीला बांधला. तेव्हा त्याच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या. त्याने मृत बायकोला आपल्या घरी म्हणजेच मध्य प्रदेशला घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. मागील 10 वर्षांपासून दोघांचा संसार सुरू होता, पण नियतीचा काळ आल्याने संसार उद्ध्वस्त झाला.
रक्षाबंधनासाठी अमित लोणारा येथून मोटारसायकलवरून देवलापारहून करणपूर येथे चालला होता. सुरूवातीला मदत मागूनही कोणीही त्याला मदत केली नाही. तेव्हा पोलिसांनी हे चित्र पाहिले आणि ग्यारसीचा मृतदेह आपल्या ताब्यात घेतला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आला.
हे ही वाचा : 'दहीहंडी'चा सराव जीवघेणा ठरला! 11 वर्षीय गोविंदा थरावर चढला, पण तोल गेला अन्... मुंबईतील दुर्दैवी घटना
या एकूण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नवऱ्याच्या डोळ्यात पाणी असून त्याने आपल्या मोटारसायकलला बायकोचा मृतदेह बांधला आणि गावाकडची वाट धरली, संबंधित प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
ADVERTISEMENT
