Maharashtra Weather : ऐन दिवाळीच्या तोंडावर पाऊस करणार विचका, 'या' जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट

मुंबई तक

• 05:00 AM • 16 Oct 2025

Maharashtra Weather Today: काही ठिकाणी मात्र, ऐन दिवाळीच्या तोंडावर पावसाच्या परिस्थितीची शक्यता आहे. तर जाणून घ्या 16 ऑक्टोबर रोजी कसा असेल हवामानाचा अंदाज. 

Maharashtra Weather

Maharashtra Weather

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार

point

16 ऑक्टोबर रोजी कसा असेल हवामानाचा अंदाज

Maharashtra Weather : भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, 16 ऑक्टोबर रोजी राज्यात काही ठिकाणी कोरडे हवामान राहण्याची हवामान विभागाने शक्यता जारी केली आहे. तर काही ठिकाणी मात्र, ऐन दिवाळीच्या तोंडावर पावसाच्या परिस्थितीची शक्यता आहे. तर जाणून घ्या 16 ऑक्टोबर रोजी कसा असेल हवामानाचा अंदाज. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी ज्या घरात राहत होती त्याच नराधमाने... डोंबिवलीतील मुलीनं धाडस करत डोकं लावलं अन्...

कोकण विभाग : 

कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर आणि ठाणे जिल्ह्याचा समावेश होतो. या एकूण जिल्ह्यांपैकी पालघर जिल्ह्यात हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला आहे. ठाणे, मुंबईत आणि सिंधुदुर्गात हलक्या पावसासह वाऱ्याची शक्यता आहे. रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यात हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. 

मध्य महाराष्ट्र : 

मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर  या जिल्ह्यांचा समावेश होतो. या जिल्ह्यांपैकी धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे या जिल्ह्यात पावसाने येलो अलर्ट जारी केला आहे. कोल्हापूर, नंदूरबार, सांगली, सोलापूर या जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज आहे. 

मराठवाडा :

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांचा समावेश होतो. या जिल्ह्यांपैकी छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव जिल्ह्यात हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. 

हे ही वाचा : जालना जिल्ह्यातील पाझर तलावात दोघेही भाऊ पोहायला गेले, पाण्याचा अंदाज न आल्याने गटांगळ्या खात बुडून...

विदर्भ : 

राज्यातील विदर्भात अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांचा समावेश होतो. या सर्वच जिल्ह्यांना कसलीही चेतावणी दिली नाही.