तुळजाभवानी मंदिरात पुजाऱ्यांमध्ये राडा, तुंबळ हाणामारी; नेमकं काय घडलं?

मुंबई तक

21 Oct 2026 (अपडेटेड: 21 Oct 2026, 01:09 PM)

Tuljabhavani Temple Priests clash : तुळजाभवानी मंदिरात सीमोल्लंघन उत्सवादरम्यान देवीचा पलंग विसर्जित करताना नगर आणि तुळजापूर येथील पुजाऱ्यांमध्ये हाणामारी झाली. या घटनेत नगरकडील एक पुजारी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

Tuljabhavani Temple Priests clash

Tuljabhavani Temple Priests clash

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

तुळजाभवानी मंदिरात पुजाऱ्यांमध्ये राडा

point

तुंबळ हाणामारी; नेमकं काय घडलं?

Tuljabhavani Temple Priests clash , गणेश जाधव : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरात सीमोल्लंघन उत्सवादरम्यान पुजाऱ्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. देवीचा पलंग विसर्जित करत असताना नगर आणि तुळजापूर येथील पुजाऱ्यांमध्ये वाद होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. या घटनेत नगरकडील एक पुजारी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. विशेष म्हणजे, मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त आणि खासगी सुरक्षा रक्षक तैनात असतानाही हा प्रकार घडला. त्यामुळे उत्सवादरम्यान मंदिर परिसरात एकच गोंधळ उडाला.

हे वाचलं का?

हेही वाचा : कराडजवळ भीषण अपघात! महालक्ष्मीचं दर्शन घेऊन परतणाऱ्या चार मित्रांचा मृत्यू, तिघे गंभीर

तुळजाभवानी मंदिरातील पुजाऱ्यांमध्ये वाद

सीमोल्लंघन उत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवीचा पलंग विसर्जित करण्याची प्रक्रिया सुरू असताना हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे. यावेळी नगरच्या पुजाऱ्यांमध्ये आणि तुळजाभवानी मंदिरातील पुजाऱ्यांमध्ये वाद झाला. त्यानंतर दोन्ही बाजूंच्या पुजाऱ्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचे सांगितले जात आहे. बंदोबस्तासाठी पोलीस कर्मचारी उपस्थित असतानाच हा प्रकार घडल्याने मंदिरातील सुरक्षा व्यवस्था आणि उत्सवाच्या नियोजनाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. या घटनेत नगरकडील एका पुजाऱ्याला दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, हाणामारी नेमकी कोणत्या कारणावरून झाली, याबाबत सविस्तर माहिती समोर आलेली नाही.

हेही वाचा : कराडजवळ भीषण अपघात! महालक्ष्मीचं दर्शन घेऊन परतणाऱ्या चार मित्रांचा मृत्यू, तिघे गंभीर

पोलीस आणि महसूल विभागातील कर्मचाऱ्यांचा बोलण्यास नकार 

दरम्यान, या घटनेबाबत पोलीस आणि महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी बोलण्यास नकार दिल्याची माहिती आहे. तसेच नगरकडील पुजारी या प्रकरणी तक्रार देणार नसल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यामुळे या घटनेबाबत अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. आई तुळजाभवानी देवीच्या सीमोल्लंघन उत्सवादरम्यानच पुजाऱ्यांमध्ये हाणामारी झाल्याने मंदिर परिसरातील व्यवस्थापनाचा मुद्दा चर्चेत आला आहे. उत्सवाच्या वेळी पोलीस बंदोबस्त आणि खासगी सुरक्षा रक्षक उपस्थित असतानाही दोन गटांमध्ये हाणामारी झाल्याने या प्रकाराची चर्चा सुरू झाली आहे.

यापूर्वीही तुळजाभवानी मंदिरातील व्यवस्थेवरून वाद निर्माण झाला होता. सहा दिवसांपूर्वी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश देण्याच्या मुद्द्यावरून प्रश्न उपस्थित झाले होते. राष्ट्रपती, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनाही गाभाऱ्यात प्रवेश दिला जात नसल्याचे सांगितले जात असताना, सोलापूरच्या मटका किंगला थेट गाभाऱ्यात प्रवेश मिळाल्याचा प्रकार समोर आला होता. अरुण प्रभाकर रोडगे ऊर्फ दादा रोडगे याला गाभाऱ्यात प्रवेश कसा मिळाला, असा सवाल उपस्थित करण्यात आला होता. या प्रकरणी श्री तुळजाभवानी भोपी-पुजारी मंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनीही दोषींवर कारवाई करण्याचे स्पष्ट केले होते. या घटनेनंतर आता सीमोल्लंघन उत्सवादरम्यान पुजाऱ्यांमध्ये हाणामारी झाल्याने मंदिरातील व्यवस्थेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित होत आहेत.