बीड: घाणेरड्या कामासाठी तृतीयपंथीयाने केली मदत, तरूणीला खोलीत नेलं अन् आळीपाळीने गँगरेप...

मुंबई तक

Beed Crime : तृतीयपंथीयांच्या मदतीने बीडमध्ये एका तरुणीवर सामुहिक बलात्कार करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली.

ADVERTISEMENT

beed crime
beed crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

तृतीयपंथीयांच्या मदतीने बीडमध्ये तरुणीवर सामुहिक बलात्कार

point

नेमकं काय घडलं?

Beed Crime : तृतीयपंथीयांच्या मदतीने बीडमध्ये एका तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली. काम देण्याचे आमिष दाखवून एका तृतीयपंथीयाने 20 वर्षीय तरुणीवर साथीदारांच्या मदतीने बलात्कार केला आहे. ही घटना शनिवारी परळी तालुक्यातील अस्वल आंबा शिवारात घडली. या प्रकरणी तृतीयपंथीयांसह चौघांवर आंबेजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

हे ही वाचा : 'माझे घर धोक्यात... ते वाचवा', अभिनेता किशोर कदमांची 'ती' Facebook पोस्ट प्रचंड Viral

नेमकं काय घडलं? 

या घटनेतील पीडित तरुणीही मूळची हैदराबाद येथील आहे. पोटापाण्यासाठी ती मुंबईतील उच्चभ्रू लोकांच्या घरी जाऊन साफसफाईचे काम करायची. पीडितेनं पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, ती मुंबईहून हैदराबादकडे जाण्यास निघाली होती. तिला प्रवासादरम्यान भूक लागल्याने ती परळीत उतरली असता, एका हॉटेलात जेवण करत असताना तिच्यासोबत हे हैवानी कृत्य घडले. दरम्यान, नराधम तृतीयपंथीचं नाव पूजा गिट्टे असे आहे.

आळीपाळीने बलात्कार 

पूजाने पीडितेचं म्हणणं ऐकलं आणि काम मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर पूजाने सतीश अण्णासाहेब मुंडे आणि मोहसीन सरदार पठाण या दोघांना बोलावले. त्यानंतर ते तिघेही पीडितेला मोटारसायकलवर बसवून अस्वलआंबा येथील भागवत अंगद कांदे या चौथ्या साथीदाराकडे घेऊन गेले. पीडितेला एका खोलीत नेले आणि नंतर तिला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तिला मारहाण केली आणि तिच्यावर एकेकाने बलात्कार केला.

संबंधित प्रकरणात एकूण चार आरोपींवर आंबेजोगाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. संबंधित प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे करत आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp