Pune: शेवटचा क्षणी मुखी विठ्ठलाचे नाम, अपघातात जीव गमवालेल्या महिलांचा 'तो' Video तुमच्याही डोळ्यात आणेल अश्रू!
Pune Kundeshawr Accident : पुण्यातील खेड तालुक्यात झालेल्या अपघातातील तब्बल 10 जणांचा झाला आहे. पण या भीषण अपघाताच्या काही क्षण आधी गाडीमधील महिला या विठ्ठलाची गाणी म्हणत असल्याचा व्हिडिओ हा समोर आला आहे. जो आता प्रचंड व्हायरल होत आहे.

बातम्या हायलाइट

कुंडेश्वर येथे दर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाने घाला

महिला भाविकांनी भरलेल्या वाहनाचा अपघात

मृतांच्या संख्येत वाढ
Pune Kundeshawr Accident News: पुण्यातील खेड तालुक्यातील कुंडेश्वर दर्शनासाठी निघालेल्या महिला भाविकांचा भीषण अपघात झाला आणि यात 10 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ज्यामध्ये सर्वाधिक महिलांची संख्या आहे. तर 27 महिला या गंभीर जखमी झाल्या आहेत. या दुर्दैवी अपघाताच्या काही मिनिटांपूर्वीच पिक-अप गाडीतून जात असताना याच महिला विठ्ठलाची गाणी म्हणत होत्या. अत्यंत भक्तिभावाने कुंडेश्वराच्या दर्शनाला निघालेल्या या महिलांचा प्रवासावर पुढच्याच क्षणी काळाने घाला घातला.
विठ्ठलाचे नाव मुखी अन् मृत्यूचा घाला, तोच ठरला शेवटचा क्षण…
विठ्ठलाचे नाव मुखी असतानाच या महिला ज्या गाडीत बसल्या होत्या त्याचा भीषण अपघात झाला. दरम्यान, विठ्ठलाच्या नामरंगात दंगून गेलेल्या महिलांचा व्हिडिओ आता समोर आला आहे. हा सध्या व्हिडिओ व्हायरल होत असून तो पाहून प्रत्येक जण हळहळ व्यक्त करत आहे.
नेमका कसा झाला अपघात?
पुण्यातील खेड तालुक्यात सोमवारी 11 ऑगस्ट रोजी भीषण अपघात झाला होता. श्रावणी सोमवारच्या निमित्ताने भाविक महादेवाच्या दर्शनासाठी कुंडेश्वर येथे दर्शनासाठी जाणाऱ्या महिला भाविकांवर काळाने घाला घातला. महिला भाविकांनी भरलेल्या वाहनाचा अत्यंत भीषण असा अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, ज्यामध्ये अनेक महिलांचा जागीच जीव गेला.
हे ही वाचा : 'दहीहंडी'चा सराव जीवघेणा ठरला! 11 वर्षीय गोविंदा थरावर चढला, पण तोल गेला अन्... मुंबईतील दुर्दैवी घटना
मृतांच्या आकड्यात वाढ
महिला भाविकांनी भरलेली गाडी चढावरून पलटी झाल्याने हा अपघात झाला. ही गाडी एक दोन वेळा नाही, तर पाच ते सहा वेळा पलटी झाली. या गंभीर अपघातात 11 ऑगस्ट रोजी तर सात जणांचा मृत्यू झाला होता. तर आज (12 ऑगस्ट) रोजी मृत्यांच्या संख्येत आणखी वाढ झाली आहे. त्यामुळे अपघातातील मृतांचा आकडा हा 10 पर्यंत पोहचला आहे
अपघाताच्या आधी महिलांच्या तोंडी विठ्ठलाचे नाव, पाहा VIDEO
रुग्णालयात उपचार सुरू
अपघातात जखमीवर चांडोली रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. चालकांनी वाहतुकीचे नियम पाळूनच प्रवास करावा, ज्यामुळे पुन्हा अशा अपघाताची समस्या निर्माण होणार नाही, असं पोलिसांनी यावेळी सांगितलं.
हे ही वाचा : नवरा बायकोला घेऊन हॉटेलात आला, मित्रासोबत शरीरसंबंध ठेवण्यास बायकोनं केला विरोध, नंतर प्रायव्हेट पार्टवरच दिल्या लाथा
श्रावण महिन्यातील सोमवारी असंख्य लोक हे कुंडेश्वराच्या मंदिरात जातात. मात्र, त्याच दिवशी दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांवर काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.