मुंबई: भारतीय हवामान खात्याने (IMD)आज (12 ऑगस्ट) साठी महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज जाहीर केला आहे. या अंदाजानुसार, राज्यातील विविध भागांमध्ये पावसाची तीव्रता आणि हवामानाच्या परिस्थितीमध्ये मोठे बदल होऊ शकतात. कोकण, विदर्भ, आणि प. महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे, यासोबतच, काही जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
बंगालच्या वायव्य उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे 12 ते 14 ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढू शकतो.
कोकण
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड: या जिल्ह्यांमध्ये 12 ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
हे ही वाचा>> श्रावणी सोमवारी काळाची झडप! कुंडेश्वरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची जीप दरीत कोसळली, 7 महिलांचा मृत्यू अन्..
मुंबई आणि उपनगर: मुंबईत 12 ऑगस्ट रोजी ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 26 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.
ठाणे आणि पालघर: या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसण्याची शक्यता आहे.
विदर्भ
गडचिरोली आणि यवतमाळ: या जिल्ह्यांसाठी 12 ऑगस्ट रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. कारण या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
हे ही वाचा>> पहलगाममध्ये शहीद झालेले विनय नरवाल यांच्या पत्नी हिमांशी नरवाल 'BIG BOSS 19' मध्ये झळकणार? समोर आलीय 'ही' महत्त्वाची अपडेट
नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया: या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. येथे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
प. महाराष्ट्र
पुणे, सातारा, कोल्हापूर: या भागात 12 ऑगस्ट रोजी ढगाळ वातावरणासह हलक्या सरींची शक्यता आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. आज देखील मुसळधार पावसाची शक्यता कमी आहे. पुणे आणि सातारा येथील घाटमाथ्यावर मध्यम पावसाची शक्यता आहे.
मराठवाडा
छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी: या भागात मध्यम पावसाचा अंदाज आहे. यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, शेतकऱ्यांना शेतातील पिकांचे संरक्षण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मराठवाड्यात पावसाचा जोर 13 ऑगस्टपासून अधिक वाढण्याची शक्यता आहे.
हवामानाचा शेतीवर परिणाम
जुलै महिन्यात चांगला पाऊस झाल्यानंतर ऑगस्टच्या सुरुवातीला पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकरी चिंतेत होते. आता 12 ऑगस्टपासून पुन्हा पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज असल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र, मुसळधार पावसामुळे पूरस्थिती, निचरा व्यवस्थेतील अडथळे आणि वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो, यासाठी प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
ADVERTISEMENT
