Himanshi Narwal Big Boss 19 Latest News : देशातच नव्हे, तर संपूर्ण जगभरा हिमांशू नरवाल यांच्या नावाची चर्चा आहे. कारण हिमांशी नरवाल पती विनय नरवाल (नौदल अधिकारी) यांच्यासोबत एप्रिल महिन्यात पहलगाममध्ये फिरायला गेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या डोळ्यासमोरच दहशतवाद्यांनी विनय यांच्यावर गोळीबार केला आणि ते या हल्ल्यात शहीद झाले. त्यानंतर पती-पत्नी दोघांचाही एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
ADVERTISEMENT
या घटनेनंतर देशातील नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली होती. दरम्यान, आता हिमांशी नरवाल यांच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. रिपोर्टनुसार, लोकप्रिय रिअॅलिटी शो बिग बॉस 19 मध्ये सहभाग नोंदवण्याची ऑफर निर्मात्यांनी हिमांशी रॉय यांना दिली आहे. याबाबत अद्यापही कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाहीय. परंतु, सोशल मीडियावर या विषयी तुफान चर्चा रंगली आहे.
कोण आहेत हिमांशी नरवाल?
हिमांशी नरवाल यांचे पती नौदल अधिकारी विनय नरवाल एप्रिल 2025 मध्ये पहलगाम हल्ल्यात शहीद झाले होते. दोघेही लग्नानंतर काश्मीरला फिरण्यासाठी गेले होते. विनय यांच्या निधनानंतर हिमांशी यांचा भावनिक फोटो व्हायरल झाला होता. यामध्ये त्या शहीद पती विनय यांच्या मृतदेहाजवळ बसलेल्या दिसत होत्या. या व्हायरल फोटोने देशातील लाखो लोकांचं मन जिंकलं होतं आणि देशभरातून त्यांना सहानुभूती मिळाली होती.
हे ही वाचा >> पैसा-पाणी: स्वस्त रशियन तेलाचा फायदा कोणाला मिळाला?
हिमांशी शो मध्ये सहभागी होणार का?
हिमांशी नरवाल यांना बिग बॉस 19 ची कोणतीही ऑफर मिळाली नाही. त्या या शोमध्ये सहभागी होणार नाही, अशाही चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. शो च्या प्रिमियर नंतरच या चर्चा खऱ्या आहेत की खोट्या, याची पुष्टी होणार आहे.
बिग बॉस 19 चं नवं ट्वीस्ट
बिग बॉस 19 चा नवीन प्रोमो प्रदर्शित झालेला आहे. यामध्ये होस्ट सलमान खानला एका नेत्याच्या भूमिकेत दाखवण्यात आलं आहे. यावेळी शो ची थिम घरातील सरकार अशी ठेवण्यात आली आहे. यामध्ये घरातील सदस्यांना सर्व निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले होते. पण एखादा निर्णय चुकीचा ठरला तर त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागणार आहेत.
शो मध्ये कोण कोण होणार सहभागी ?
रिपोर्टनुसार, बिग बॉस 19 मध्ये तारक मेहता का उल्टा चष्मा शो चे कलाकार शैलेश लोढा आणि गुरुचरण सिंह, मुनमुन दत्ता, लता सभरवाल, फैजल शेख, जन्नत जुबेर, पूरव झा, अपूर्वा मखीजासारखे कलाकारांचा समावेश आहे. दरम्यान, हा शो 24ऑगस्ट रोजी कलर्स टीव्ही आणि जिओ हॉटस्टारवर प्रसारित होणार आहे.
हे ही वाचा >> तरुण घुसला शेजारच्या घरात..मुलगी अन् वहिनीचा आंघोळ करतानाचा न्यूड व्हिडीओ काढला, नंतर केलं घाणेरडं कृत्य अन्..
ADVERTISEMENT
