मुंबई: टीव्ही अभिनेत्री गौतमी कपूरने तिच्या मुलीला तिच्या 16 व्या वाढदिवशी सेक्स टॉय गिफ्ट करायचे होते असा खुलासा केला आहे. एका मुलाखतीत ती म्हणाली, "माझी मुलगी 16 वर्षांची झाली तेव्हा मला तिला काहीतरी गिफ्ट करायचे होते. मी विचार करत होते की, मी तिला सेक्स टॉय गिफ्ट करावे? मी तिला व्हायब्रेटर गिफ्ट करावे की आणखी काही? पण, जेव्हा मी तिला याविषयी विचारलं तेव्हा ती काही ती वेगळ्याच पद्धतीने बोलू लागली. ती काहीशी चिडली देखील होती.'' दरम्यान, गौतमीचा हाच व्हिडिओ इंटरनेटवर सध्या बराच व्हायरल होत आहे.
ADVERTISEMENT
गौतमी कपूरचा हा व्हिडिओ शुक्रवारी हॉटरफ्लायने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. तिच्या मुलाखतीमधील ही व्हिडिओ क्लिप बरीच व्हायरल होत आहे. यामध्ये गौतमी तिच्या मुलीला व्हायब्रेटर गिफ्ट करण्याचा विचार का केला हे सांगत आहे. ती म्हणाली, “जेव्हा मी तिच्याशी याबद्दल बोलले तेव्हा मी म्हणाले, ‘सिया, मी तुला सेक्स टॉय देण्याचा विचार करत आहे.’ ती म्हणाली, ‘आई, तू वेडी झाली आहेस का? तुझं डोकं फिरलं आहे?''
हे ही वाचा>> प्रसिद्ध अभिनेत्रीचं अश्लील चित्रपटात काम, आता चांगलीच अडकली..
गौतमी कपूर पुढे म्हणाली, 'मी म्हणाले, विचार करा. किती आई त्यांच्या मुलींकडे जाऊन याबाबत बोलत असतील, मी तुला काही गोष्ट का देऊ नये आणि तू त्या वापराव्यात.’असं म्हणताना गौतमीने हे देखील सांगितलं की, तिला तिच्या मुलीला जीवनाचा लैंगिक गोष्टी एक्सप्लोर करून द्यायचा आहेत. 'माझ्या आईने जे केलं नाही, ते मी माझ्या मुलीबाबत करू इच्छित नाही. मला तिला सर्वकाही अनुभव घेऊ द्यायचं आहे.'
गौतमी कपूरची मुलगी आता 19 वर्षांची
गौतमी कपूर पुढे म्हणाली, “अनेक महिला आनंद अनुभवल्याशिवाय आयुष्यात पुढे निघून जातात. अशा परिस्थितीत का राहावे? आज माझी मुलगी 19 वर्षांची आहे आणि ती किमान त्याचे कौतुक करते की, मी तिच्याबाबत काही गोष्टींसाठी विचार तरी केला. ती यासाठी माझा आदर करते. मला वाटते की हे आश्चर्यकारक आहे.”
हे ही वाचा>> स्मिताने बिकिनी फोटो केले शेअर, 'पप्पी दे पारूचा' हॉट लूक... विषय हार्ड!
गौतमी कपूर राम कपूरची पत्नी
गौतमी कपूरचे लग्न अभिनेता राम कपूरशी झाले आहे. 2003 साली व्हॅलेंटाईन डे ला दोघांनी लग्न केले होते. त्यांना दोन मुले आहेत. सिया नावाची मुलगी आणि अक्स नावाचा मुलगा. कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर गौतमी कपूर बऱ्याच काळापासून पडद्यापासून दूर आहे. तथापि, राम कपूर शेवटचा 'मिस्त्री' मध्ये दिसला होता, जो या वर्षी प्रदर्शित झाला.
ADVERTISEMENT
