Maharashtra Weather : भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) दिलेल्या अंदाजानुसार, उद्या (9 डिसेंबर) महाराष्ट्रात कोरडे हवामान राहील. अशातच किमान तापमानात हळूहळू घसरण होत असल्याने थंडीत वाढ होईल. विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या थंड लाटेची शक्यता असली, तरी ती मर्यादित राहण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : पालघरमध्ये रक्षक झाले भक्षक, महिलेला चौकशीसाठी बोलावलं, पोलीस ठाण्यातच... हवालदार झाला राक्षस
कोकण विभाग :
कोकण विभागात मुख्यत्वे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर आणि मुंबई यांचा समावेश होतो. यापैकी मुंबईमध्ये रात्रीच्या वेळी हलक्या प्रमाणात थंडीची शक्यता असली तरीही ती मर्यादीत राहील.
मध्य महाराष्ट्र विभाग :
मध्य महाराष्ट्र विभागात धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांचा समावेश होतो. यापैकी पुणे शहरात सकाळी हलकी धुके पडण्याची शक्यता, पण दिवसभर सूर्यप्रकाश राहील, अशी शक्यता राहिल.
मराठवाडा विभाग :
मराठवाडा विभागात सर्वच जिल्ह्यांमध्ये कोरडं वातावरण राहणार असल्याची शक्यता आहे. मराठवाड्यातही कोरडे हवामान, 11-12 डिसेंबरनंतर थंड लाट मजबूत होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : फुगा फुगवताना फुटला अन् श्वास नलिकेत अडकून बसला, 13 वर्षीय मुलीचा अंत
विदर्भ विभाग :
विदर्भ विभागात डिसेंबरच्या सुरुवातीलाच थंडीची लाट जाणवत आहे. तसेच हवामान कोरडं राहण्याची देखील दाट शक्यता आहे. विदर्भात काही ठिकाणी थंड लाटेच्या पार्श्वभूमीवर किमान तापमानात 1-2 अंशांची घसरण होण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT











