Palghar crime : डहाणू तालुक्यातील कासा पोलिस ठाण्याच्या हद्दीतच महिला सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे करणारी एक गंभीर घटना समोर आली आहे. चौकशीसाठी बोलावलेल्या तरुणीशी अयोग्य वर्तन करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी कासा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका हवालदाराला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे स्थानिक पोलिस यंत्रणेत मोठी खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
पत्नीला सोडून दुसऱ्या मुलीसोबत राहत असल्याची तक्रार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कासा परिसरातील एका विवाहित महिलेने 25 ऑक्टोबर रोजी तक्रार दाखल केली होती. त्या महिलेचा आरोप होता की तिचा पती तिला सोडून डहाणूजवळील गावातील एका तरुण मुलीसोबत राहतो आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची जबाबदारी कासा पोलिस ठाण्यातील हवालदार शरद भोगाडे (वय 41) यांच्याकडे सोपविण्यात आली. या तक्रारीच्या तपासाचा एक भाग म्हणून भोगाडे यांनी त्या तरुणीला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले. सुरुवातीला एकदा चौकशी झाल्यानंतर, आठवडा उलटताच त्यांनी तिला पुन्हा बोलावले.
चौकशीच्या नावाखाली तरुणीवर अत्याचार
तरुणीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, दुसऱ्या भेटीत हवालदार भोगाडे यांनी तिला पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका निर्जन ठिकाणी नेले आणि तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. धक्क्यात गेलेल्या तरुणीने काही दिवसांनी धैर्य एकवटून रविवारी डहाणू पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.
तक्रारीनंतर तात्काळ कारवाई – हवालदार अटकेत
डहाणू पोलिसांनी तक्रार मिळताच तत्काळ गुन्हा दाखल केला आणि तपास कासा पोलिसांकडे वर्ग केला. तपास पथकाने प्राथमिक माहितीच्या आधारे हवालदार शरद भोगाडे यांना अटक केली आहे. आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.
स्थानिकांमध्ये संतापाची लाट
घटनेनंतर कासा आणि डहाणू परिसरात नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून, चौकशीच्या निमित्ताने बोलावलेल्या मुलीचीच सुरक्षितता धोक्यात आली याबद्दल लोकांनी संताप व्यक्त केला आहे. महिलांच्या सुरक्षेसंबंधीचे प्रश्न आणि पोलीसांकडून होणाऱ्या गैरवर्तनाबाबत कठोर पावले उचलण्याची मागणी होत आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे आणि पीडितेला आवश्यक तांत्रिक व कायदेशीर मदत दिली जात असल्याची माहिती मिळाली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
शिंदे-फडणवीसांची दीड तास बंद दाराआड चर्चा, मुंबईसह ठाणे महापालिका लढवण्याबाबत मोठा निर्णय
ADVERTISEMENT











