शिंदे-फडणवीसांची दीड तास बंद दाराआड चर्चा, मुंबईसह ठाणे महापालिका लढवण्याबाबत मोठा निर्णय

मुंबई तक

Mumbai and Thane Mahapalika Election : याशिवाय, दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या पक्षात प्रवेश करण्यास कडक मनाई करावी, यावरही बैठकीत एकमत झाले. महायुतीची ताकद अबाधित ठेवण्यासाठी असा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ADVERTISEMENT

Mumbai and Thane Mahapalika Election
Mumbai and Thane Mahapalika Election
social share
google news

बातम्या हायलाइट

point

शिंदे-फडणवीसांची दीड तास बंद दाराआड चर्चा

point

मुंबईसह ठाणे महापालिका लढवण्याबाबत मोठा निर्णय

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात उशिरा रात्री मोठ्या घडामोडी झालेल्या पाहायला मिळाल्या आहेत. राज्यातील आगामी नगरपालिका निवडणुका महायुती म्हणून एकत्र येऊन लढवण्याचा निर्णय भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) या दोन्ही पक्षांनी घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात जवळपास दीड तास बंद-दरवाजा बैठक पार पडली. या बैठकीत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री रवींद्र चव्हाण हेही उपस्थित होते.

भाजप आणि शिंदेसेनेच्या वरिष्ठांच्या कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या सूचना 

बैठकीत मुंबई, ठाणे सहित राज्यातील सर्व महापालिका निवडणुका महायुती म्हणून एकत्रितपणे लढवण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. महायुतीचं वर्चस्व वाढवण्यासाठी आणि जागावाटपाची प्राथमिक रूपरेषा आखण्यावर दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी सहमती दर्शवली. पुढील दोन ते तीन दिवसांत प्रत्येक महापालिकेच्या पातळीवर स्थानिक नेत्यांमध्ये स्वतंत्र चर्चा सुरू होणार आहे. स्थानिक परिस्थितीनुसार अंतिम रणनीती आखण्याचे निर्देश वरिष्ठ नेतृत्वाने दिले आहेत.

हेही वाचा : पालघरमध्ये रक्षक झाले भक्षक, महिलेला चौकशीसाठी बोलावलं, पोलीस ठाण्यातच... हवालदार झाला राक्षस

याशिवाय, दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या पक्षात प्रवेश करण्यास कडक मनाई करावी, यावरही बैठकीत एकमत झाले. महायुतीची ताकद अबाधित ठेवण्यासाठी असा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यातील राजकीय समीकरणांना नवं वळण देणाऱ्या या घडामोडींनंतर महापालिका निवडणुकांचे चित्र अधिक स्पष्ट होत असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp