शिंदेंच्या आमदाराचा नोटांचे बंडल रचतानाचा व्हिडीओ दानवेंकडून शेअर, आता महेंद्र दळवी समोर; चॅलेंज देत म्हणाले..

मुंबई तक

Ambadas Danve tweeted video : महेंद्र दळवी म्हणाले, अंबादास दानवेंनी तो फोटो नीट पाहावा, व्यवस्थित ट्वीट करावा. लाल टी शर्टवाला व्यक्ती कोण आहे? हे उभा महाराष्ट्र बघेल. त्या व्हिडीओमध्ये मी असेन तर आमदारकीचा राजीनामा देईन. कोणाला तर ब्लॅकमेल करणे, हे अंबादास दानवेंचा धंदा आहे.

ADVERTISEMENT

Ambadas Danve tweeted video
Ambadas Danve tweeted video
social share
google news

बातम्या हायलाइट

point

शिंदेंच्या आमदाराचा नोटांचे बंडल रचतानाचा व्हिडीओ दानवेंकडून शेअर,

point

आता महेंद्र दळवी समोर; चॅलेंज देत म्हणाले..

Ambadas Danve tweeted video, नागपूर : नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उशिरा रात्री एक “कॅश बॉम्ब” टाकत शिंदे गटाला धारेवर धरलंय. दानवे यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडीओ शेअर केला असून त्यात अलिबागचे शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी नोटांचे बंडल रचताना पाहायला मिळत आहेत. या व्हिडिओमुळे राज्यातील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे.

“शेतकऱ्यांसाठी पैसा नाही, पण इथे नोटांचे ढीग?” — दानवे

एक्सवर व्हिडिओ शेअर करताना दानवे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. “या सरकारकडे शेतकरी कर्जमाफीसाठी निधी नाही, पण इथे मात्र नोटांचे बंडल दिसत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे जी यांनी स्पष्ट करावे की हे आमदार कोण आणि या पैशांचा उपयोग कशासाठी केला जात आहे?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा : 'जिन्नांच्या दबावाखाली काँग्रेसची शरणागती', वंदे मातरम गीतावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य

“मी अधिकृत तक्रार करणार” — दानवे यांची भूमिका

अंबादास दानवे म्हणाले, “व्हिडिओमध्ये सत्ताधारी पक्षातील काही लोक स्पष्ट दिसत आहेत. इतकी मोठी रक्कम कुठून व कशासाठी आणली? याचा तपास झाला पाहिजे. पोलिसांनी यामागचे सत्य शोधावे. मी याबाबत तक्रार दाखल करणार आहे. कोणाचे नाव घेण्याचा हेतू नाही, पण चौकशी आवश्यक आहे.”

हे वाचलं का?

    follow whatsapp