स्मिताने बिकिनी फोटो केले शेअर, 'पप्पी दे पारूचा' हॉट लूक... विषय हार्ड!
Smita Gondkar: अभिनेत्री स्मिता गोंदकर हिने नुकतेच तिचे काही फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती बिकिनीमध्ये दिसून येत आहे. तिचा हा ग्लॅमरस लूक तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.
ADVERTISEMENT

स्मिताने नवे बिकिनी फोटो केले शेअर
मुंबई: अभिनेत्री स्मिता गोंदकर हिने तिचे नुकतेच अत्यंत ग्लॅमरस असे फोटो शेअर केले आहेत. स्मिता गोंदकरने तिचे बिकिनीमधील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती कमालीची सुंदर दिसते आहे. तिच्या या हॉट लूकवर चाहते देखील प्रचंड फिदा झाले आहेत. पाहा तिचे काही खास फोटो.

स्मिता गोंदकरचा जन्म 18 एप्रिल 1984 रोजी म्हैसूर येथे झालेला. तिने शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथील फर्ग्युसन कॉलेजमधून पूर्ण केले आणि हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्सही केला.

स्मिताने मराठी चित्रपट “मुंबईचा डबेवाला” (2006) मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं.

मात्र तिला “पप्पी दे पारुला” या मराठी म्युझिक व्हिडिओमुळे मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली, जे महाराष्ट्रात खूप गाजलं होतं.










