प्रसिद्ध अभिनेत्रीचं अश्लील चित्रपटात काम, आता चांगलीच अडकली..

Shweta Menon Viral News :  प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत एक खळबळजनक बातमी समोर आली आहे.  झटपट श्रीमंत होण्यासाठी या अभिनेत्रीने अश्लील चित्रपट काम केलंय, असा आरोप करण्यात आला आहे.

allegations on Bollywood actress Shweta menon for working in obscene movies and advertisements case filed today viral news
फोटो सौजन्य: instagram
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अभिनेत्रीवर अश्लील चित्रपट करण्याचा आरोप

point

कोण आहे श्वेता मेनन?

point

आमिर खान, अजय देवगणसोबतही केलंय काम

Shweta Menon Viral News:  प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत एक खळबळजनक बातमी समोर आली आहे.  झटपट श्रीमंत होण्यासाठी या अभिनेत्रीने अश्लील चित्रपट काम केलंय, असा आरोप करण्यात आला आहे. हे प्रकरण कोच्ची येथील एर्नाकुलम सेंट्रल पोलिसांनी उघडकीस आणलंय. येथील दाक्षिणात्य अभिनेत्री श्वेता मेननने पैसे कमवण्यासाठी अश्लील चित्रपट आणि जाहिरातींमध्ये काम केल्याप्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, सामाजिक कार्यकर्ते मार्टिन मेनाचेरी यांनी श्वेता मेननच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर एर्नाकुमल सीजेएम न्यायालयाने स्थानिक पोलिसांना कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे मेननवर यासंबंधीत कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अभिनेत्रीवर अश्लील चित्रपट करण्याचा आरोप

श्वेता मेननविरोधात पोलिसांनी आता गुन्हा दाखल केला आहे.  श्वेताने फक्त दक्षिणात्य नव्हे, तर हिंदी चित्रपटातही काम केलं आहे. तिने मल्ल्यालम चित्रपट 'रथिनिर्वेदम' आणि 'सॉल्ट एन पेपर' मध्ये काम केलं होतं. तसच सलमान खानचा चित्रपट बंधन आणि अशोका सारख्या बॉलिवूड चित्रपटातही काम केलं आहे. पोलिसांनी म्हटलं की, श्वेताने पैशांच्या लालसापोटी अश्लील चित्रपट आणि जाहीरातींमध्ये काम केलं आहे.

हे ही वाचा >> टॉयलेट क्लीनर पाजलं आणि पत्नीलाच संपवलं, हत्येपूर्वी मौलानाने केली बेदम मारहाण अन् मृतदेह...

कोण आहे श्वेता मेनन?

तक्रारीत म्हटलंय की, श्वेता मेननने एका कंडोमच्या जाहिरातीतही काम केलं आहे.  23 एप्रिल 1974 रोजी जन्मलेल्या श्वेता मेनन लोकप्रिय अभिनेत्री आहे. जिने मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात केली. त्यानंतर टेलिव्हिजन अँकर आणि अभिनेत्री म्हणून ती प्रसिद्ध झाली.  ती वर्ष 1974 मध्ये मिस इंडिया एशिया पॅसिफिक टायटलही जिंकलं आहे. तिने मल्ल्यालम चित्रपटांशिवाय हिंदी, तामिळ आणि तेलुगु मध्ये काम केलं आहे.

आमिर खान, अजय देवगणसोबतही केलंय काम

श्वेता मेनने वर्ष 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या इश्क चित्रपटातही काम केलं आहे. हमको तुमचे प्यार है..या गाण्यातही तिने जबरदस्त डान्स केला होता. तसच सलमान खानसह, अजय देवगण यांच्या चित्रपटातही श्वेताने काम केलं आहे. श्वेताने जवळपास 30 हिंदी चित्रपटात काम केलं आहे.

हे ही वाचा >> मुंबईची खबर: रेल्वे प्रवाशांसाठी मोठी अपडेट! 'या' गाड्यांच्या वेळापत्रकात होणार बदल, नव्या सिस्टीमचा परिणाम...

हे वाचलं का?

    follow whatsapp