गर्भवती पत्नीलाच अ‍ॅसिड पाजलं, मौलानाने पत्नीला मृत्यूआधी दिल्या भयंकर मरणयातना

मुंबई तक

छत्तीसगडमधील बिलासपूरमध्ये येथे एका मौलानाने आपल्या गर्भवती पत्नीला अ‍ॅसिड पाजून तिची निर्घृणपणे हत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे.

ADVERTISEMENT

टॉयलेट क्लीनर पाजलं आणि पत्नीलाच संपवलं, हत्येपूर्वी मौलानाने केली बेदम मारहाण
टॉयलेट क्लीनर पाजलं आणि पत्नीलाच संपवलं, हत्येपूर्वी मौलानाने केली बेदम मारहाण
social share
google news

बातम्या हायलाइट

point

टॉयलेट क्लीनर पाजलं आणि पत्नीलाच संपवलं

point

हत्येपूर्वी मौलानाने केली पत्नीला बेदम मारहाण

Crime news: छत्तीसगडमधील बिलासपूरमधून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. येथे एका मौलानाने आपल्या गर्भवती पत्नीला अ‍ॅसिड पाजून तिची निर्घृणपणे हत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे. पत्नीच्या मृत्यूनंतर तो आपल्या पत्नीचा मृतदेह मिर्झापूर (उत्तर प्रदेश) येथील वडिलोपार्जित घरी घेऊन गेला आणि तिथे तिचा मृतदेह पुरला. तसेच, ही घटना 12 जुलै रोजी घडली असून 14 दिवसांनी म्हणजेच 26 जुलै रोजी कुटुंबियांच्या मागणीवरुन मृतदेह कबरीतून बाहेर काढण्यात आला.

प्राथमिक तपासावरुन सलमा नावाच्या महिलेची अॅसिडने जाळून हत्या करण्यात आल्याचं समोर आलं. मात्र, मौलानाने त्याच्या पत्नीची निर्घृणपणे हत्या करण्यामागचं कारण अद्याप स्पष्ट नाही. मृत महिलेच्या कुटुंबीयांनी दुसऱ्याच महिलेमुळे पत्नीची हत्या केल्याचा पतीवर म्हणजेच मौलानावर आरोप केला आहे.

3 डॉक्टरांनी केलं पोस्टमॉर्टम

ही घटना सिव्हिल लाइन पोलीस स्टेशन परिसरातील असल्याचं सांगण्यात येत आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सलमाला बेदम मारहाण केल्याची पुष्टी करण्यात आली. तसेच, सलमाच्या मृतदेहाचं तीन डॉक्टरांनी पोस्टमॉर्टम केल्याचं देखील सांगितलं जात आहे. पोस्टमॉर्टम केलं असता शरीरावर चार ठिकाणी जखमांच्या खुणा आढळून आल्या. पोस्टमॉर्टम दरम्यान, सलमाचा चेहरा अ‍ॅसिडने जाळला असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. सलमाच्या चेहऱ्यावर काळे डाग आढळले असून कुटुंबियांनी ते रक्ताचे डाग असल्याचं गृहीत धरलं. पण पोस्टमॉर्टम करणाऱ्या डॉक्टरांनी ते अ‍ॅसिडमुळे जळल्याने हे काळे झाले असल्याचं सांगितलं. यावरुन पीडितेला काही प्यायला दिलं असेल, हे स्पष्ट झालं.

हे ही वाचा: परदेशी तरुणीला पाहून नियत ढळली, हॉटेलच्या रुममध्ये नेलं आणि..

हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाविरुद्ध तक्रार 

या प्रकरणासंदर्भात युनिटी हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे. कुटुंबियांनी सांगितल्याप्रमाणे, त्यांना पीडित महिला मानसिकदृष्ट्या आजारी आहे आणि तिच्यावर उपचार सुरू असल्याचं रुग्णालयाच्या व्यवस्थापनाकडून सांगण्यात आलं. तसेच, मृत्यूपूर्वी महिलेच्या शरीरावर जखमेच्या किंवा हल्ल्याच्या कोणत्याही खुणा नसल्याचं देखील सांगण्यात आलं. कुटुंबियांनी या प्रकरणाची चौकशी करून कलेक्टरकडून कठोर कारवाईची मागणी केली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp