'तू आणि तुझी बहीण लेस्बियन', बायकोला दारूही प्यायला लावायचा... तरुणीची 'ही' कहाणी तुमचं काळीज टाकेल पिळवटून
crime news : लखनऊमध्ये एका मर्चंट नेव्ही ऑफिसरच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने कुटुंब हादरून गेले आहे. लग्नाच्या अवघ्या 6 महिन्यानंतर नवविवाहित तरुणीचा मृत्यू झाला, नेमक्या त्या दिवशी काय घडलं होतं?

बातम्या हायलाइट

मर्चंट नेव्ही ऑफिसरच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू

नेमकं काय घडलं?
Crime News : लखनऊमध्ये एका मर्चंट नेव्ही ऑफिसरच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने कुटुंब हादरून गेले आहे. लग्नाच्या अवघ्या 6 महिन्यानंतर नवविवाहित तरुणीचा मृत्यू झाला. मुलीच्या कुटुंबाने तिचा पती अनुराग सिंगवर खळबळजनक आरोप केले आहेत. पीडितेच्या कुटुंबाचे म्हणणे आहे की, त्यांच्या मुलीची हत्या जावयानेच केली आहे. पीडितेच्या कुटुंबाचे म्हणणे आहे की, मुलीचा पती अनुराग हा हुंड्यासाठी त्रास देत होता. त्यानेच आपल्या मुलीला अनेकदा जबरदस्ती दारू पाजली. नंतर मुलीवर संशय घ्यायचा आणि तिला अनेकदा मारहाणही केली.
हे ही वाचा : मानवतेला काळीमा! नोकरीच्या शोधासाठी तरुणी फिरत होती वनवन, चार हैवानांनी उशीरा रात्री खांबाला बांधलं अन् नंतर...
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, लखनऊ येथील इंदिरानगर येथील सेक्टर 12 येथील रहिवासी मधु सिंग यांचे लग्न उन्नाव येथील रहिवासी असलेल्या अनुराग सिंग यांच्याशी झाले होते. अनुराग सिंग हे मर्चंट नेव्हीत अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. पीडितेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, सासरच्या कुटुंबीयांनी मधुकडे 15 लाखांची मागणी केली.
मधुची बहीण प्रियाने सांगितलं की, 10 मार्च रोजी अनुरागने मधुला अगदी वाईट पद्धतीने मारहाण केली. त्याच दिवशी मधुला रडू कोसळले. तेव्हाच मधुने आपल्या कुटुंबीयांना फोनद्वारे संपर्क केला. तेव्हाही ती धायमोकलून रडू लागली होती. ही घटना मधुच्या माहेरच्या कुटुंबातील सदस्यांना समजली असता, तेव्हा त्यांचं मन हेलावून गेले.
'आम्ही दोघेही त्याला लेस्बियन वाटायचो...'
मधुच्या बहिणीने आरोप केला की, अनुरागने केवळ मधुला जबरदस्ती दारूच पाजली नाही,तर मारहाणही केली होती. मधुला प्रवास करण्याचा छंद होता, पण अनुराग तिला काहीही करू देत नसे. मधुच्या बहिणीचं म्हणणं आहे की, अनुराग मधुचा मोबाईल फोन तपासायचा. तो नेहमी तिच्यासोबत वाद घालायचा. जेव्हा मधु माझ्यासोबत बोलायची तर अनुरागला वाटायचे की, आम्ही दोघrही लेस्बियन आहोत.
मधुच्या बहिणीने दिलेल्या माहितीनुसार, मधुने आपलं जीवन संपवण्याच्या एका दिवसापूर्वीच दोघेही रविवारी बाहेरून फिरून आले होते. अनुराग तेव्हा गाडीतच दारू पित होता. रस्त्यात एक खड्डा आल्याने मधूने खड्ड्यातून कशीबशी गाडी काढली असता, पती अनुराग भडकला. तेव्हा तिला मारहाण करण्यात आली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी 4 वाजता अनुरागने तिच्या वडिलांना फोनद्वारे संपर्क साधत मधूने आत्महत्या केल्याची माहिती दिली. तेव्हाच मधुच्या कुटुंबीयांनी तडक मधुचं सासर गाठलं. तेव्हा तिने फाशी घेतल्याचा सासरच्यांनी बनाव रचला. दरम्यान, या प्रकरणात मधुच्या कुटुंबीयांना संशय होता की, मधुने आत्महत्या केली नसून तिला जबरदस्ती मारहाण करत तिचा खून केला.
हे ही वाचा : पुतणीचाच जडला काकावर जीव, नंतर दोघांनीही केलं पळून जाऊन लग्न, नंतर कुटुंबीयांनी भररस्त्यातच...
या प्रकरणात मधुचे वडील बहादुर सिंग यांनी सुशांत गोल्फ सिटी पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली. मधुच्या वडिलांचं म्हणणं आहे की, अनुरागचे अनैतिक संबंध होते. यामुळेच मधुने आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं. तसेच तिचे अबॉर्शनही करण्यात आले. या प्रकरणात पोलिसांनी पुढील तपास सुरू असल्याचं सांगितलं.