महिलेला हवे होते दिरासोबत शारीरिक संबंध, त्याच्याशिवाय जमतच नव्हतं म्हणून...
उत्तर प्रदेशात एका 28 वर्षीय तरुणाची चाकूने वार करुन आणि गोळी मारून हत्या करण्यात आल्याचं वृत्त समोर आलं आहे. पीडित तरुणीच्या पत्नीने तिचा प्रियकर म्हणजेच तिच्या दीरासोबत मिळून पतीच्या हत्येची योजना आखली, असं सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अनैतिक संबंधाच्या आड येत होता म्हणून पतीची हत्या
दीरासोबत महिलेचे अनैतिक संबंध
प्रियकरासोबतच पतीच्या हत्येचा रचला कट
Crime News: उत्तर प्रदेशात एका 28 वर्षीय तरुणाची चाकूने वार करुन आणि गोळी मारून हत्या करण्यात आल्याचं वृत्त समोर आलं आहे. पीडित तरुणीच्या पत्नीने तिचा प्रियकर म्हणजेच तिच्या दीरासोबत मिळून पतीच्या हत्येची योजना आखली, असं सांगण्यात येत आहे. गुरुवारी (7 जुलै) सकाळी 10 वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याचं समोर आलं आहे. पीडित तरुणीचं नाव शाहनवाज तर पत्नीचं नाव मैफरीन असल्याची माहिती आहे.
गोळी मारुन आरोपी फरार
एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार, शाहनवाज त्याच्या पत्नीसोबत शामली जिल्ह्यात त्याच्या मेव्हण्याच्या लग्न संमारंभासाठी जात होता. पीडित पती बाइक चालवत असताना समोरुन दोन मोटरसायकलवरील चार अज्ञात लोकांनी शाहनवाजच्या गाडीला ओव्हरटेक करत थांबवलं. मिळालेल्या वृत्तानुसार, त्या चार आरोपींनी पीडित तरुणावर दांडक्याने आणि चाकूने वार केले. त्यानंतर आरोपी तरुणांपैकी एकाने चाकू काढून शाहनवाजला गोळी मारली. पीडित तरुणावर हल्ला केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन पळून गेले.
रिपोर्टनुसार, शाहनवाजला नंतर रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, त्यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. रुग्णालयातील अधिकाऱ्यांना पीडित तरुणाच्या हात, छाती आणि मानेवर तीन खोल वार झाल्याचं आढळलं. तसेच, पीडित तरुण हरियाणाचा रहिवासी असून तो एक फर्नीचर कामगार म्हणून कार्यरत होता.
कुटुंबीयांना आला चोरीचा संशय
घटनेनंतर शाहनवाजच्या पत्नीने तातडीने कैरान पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. कुटुंबियांना सुरुवातीला हे चोरीचं प्रकरण असल्याचा संशय आला. पीडित तरुणाची मोटरसायकल आणि लग्नात आहेर म्हणून देण्यासाठी त्याच्याकडे असलेल्या पैशांमुळे चोरी करण्यासाठी आरोपींनी त्याची हत्या केल्याचा संशय कुटुंबियांनी व्यक्त केला.










