विकृतीचं टोक! महिला शौचासाठी गेली जंगलात, ट्रॅक्टरवाल्यांची पडली वाईट नजर, अन् सर्वांनी मिळून तिथेच...

Crime News : एका जंगलात शौचलायासाठी गेलेल्या एका महिलेचं लैंगिक शोषण केलं. ही घटना ओडिशातील अंगुल जिल्ह्यातील एका जंगलात घडल्याचं प्रकरण उघडकीस आले.

crime news
crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

शौचलायासाठी गेलेल्या एका महिलेचं लैंगिक शोषण

point

लैंगिक शोषण करणाऱ्यांमध्ये दोघेजण अल्पवयीन

Crime News : एका जंगलात शौचलायासाठी गेलेल्या एका काही जणांनी लैंगिक शोषण केलं. ही घटना ओडिशातील अंगुल जिल्ह्यातील एका जंगलात घडल्याचं प्रकरण उघडकीस आले. लैंगिक शोषण करणाऱ्यांमध्ये दोघेजण अल्पवयीन मुलांसह तिघांना अटक करण्यात आली, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला तिच्या पुतण्यापासून छेंडीपारा येथून मोटारसायकलवरून परतत असताना घडली. ही घटना 3 जुलै रोजी घडली आहे.

हे ही वाचा : बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाचा शुल्लक कारणावरून खून, कामावरून परतत असतानाच... नेमकं काय घडलं?

तीन पुरूष ट्रॅक्टरवरून आले आणि...

ती एका ठिकाणी रस्त्याच्या कडेला जंगलात शौचालयात जाण्यासाठी गेली तेव्हा तिच्यावर हल्ला झाला. तेव्हा तीन पुरूष ट्रॅक्टरवरून आले आणि पीडितेचं लैंगिक शोषण केल्याचं पोलिसांनी बुधवारी एका प्रेसनोटमध्ये नमूद केले. संबंधित प्रकरणात पीडितेनं मंगळवारी बगडिया पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

दोन अल्पवयीन मुलांसह तिघांना बेड्या

पोलिसांनी निवेदनात लिहिलं की, पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी तीन पथकं जारी केली आहेत. पोलिसांनी निवेदनात म्हटलं की, आरोपींना पकडण्यासाठी एसपींच्या थेट देखरेखीखाली तीन पोलीस पथके तयार करण्यात आली होती. फॉरेन्सिक पथक आणि श्वानांच्या पथकाच्या मदतीने बुधवारी दोन अल्पवयीन मुलांसह तिघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

हे ही वाचा : प्लास्टिक स्टूल, लाठी, पीव्हीसी पाईपने पतीकडून सोन्यासारख्या पत्नीचा खून, पुण्यातील चाकणमध्ये काय घडलं?

पोलिसांनी आरोपींचे ट्रॅक्टर, मोबाईल फोन्स, गुन्ह्याच्या वेळी परिधान केले कपडे आणि इतर काही पुराव्याच्या जप्त केल्या आहेत. संबंधित प्रकरणाचे 30 दिवसांत आरोपपत्र दाखल केले जाईल, असे अंगुल पोलिसांनी सांगितलं. दरम्यान, देशभरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येताना दिसतो. नराधमांना कसलाही कायद्याचा धाक राहिलेला नसल्याचं अशा प्रकरणातून नव्याने दिसून येतो. 

हे वाचलं का?

    follow whatsapp